एक्स्प्लोर

मी सांगतोय, अजितदादा बारामतीतूनच लढतील, बारामतीकरांशी त्यांचं नातं अतूट; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar Baramati Assembly Constituency : अजितदादांनी बारामतीतून लढावं ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची इच्छा नाही तर बारामतीतील जनतेची इच्छा असं सुनील तटकरे म्हणाले. 

रायगड : अजितदादा बारामती सोडून इतर मतदारसंघातून निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू असताना त्यावर आता त्यांच्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा आणि बारामती हे संबंध गेल्या 40 वर्षांपासून अतूट आहे. त्यामुळे अजितदादा बारामतीतूनच लढणार सांगतो असं वक्तव्य तटकरे यांनी केलं. त्या आधी खासदार प्रफुल्ल पटेल यांनीही दादांची बारातमीतून उमेदवारी जाहीर केली होती. आता सुनील तटकरे यांनीही त्यावर जवळपास शिक्कामोर्तब केल्याचं दिसतंय.

सुनील तटकरे म्हणाले की, अजितदादा बारामती सोडून इतर मतदारसंघातून लढणार हे वृत्त निराधार असून कुणीतरी जाणीवपूर्वक ते पसरवत आहे. अजितदादांनी बारामतीतून लढावं ही इच्छा कार्यकर्त्यांची नाही तर बारामतीच्या जनतेची आहे. अजितदादा हे बारामतीच्या विकासाचे महामेरू आहेत. त्यामुळे ते बारामतीतूनच लढतील हे मी सांगतो. 

शरद पवार गटाकडून बारामतीतून युगेंद्र पवार हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्यांनी तशी तयारीही सुरू केली आहे. त्याचवेळी लोकसभेनंतर अजित पवारांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली होती. आतापर्यंत बारामतीतून निवडून आलो, पण आता बारामतीकरांनी दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी. मग मी काय काम केलं ते त्यांना समजेल असं अजित पवार म्हणाले होते. त्यामुळेच अजित पवार हे बारामतीतून लढणार नाहीत, इतर कोणत्यातरी मतदारसंघातून ते निवडणूक  लढवतील अशी चर्चा सुरू झाली. त्यावर आता प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंच्या वक्तव्याने जवळपास पडदा टाकला असून अजित पवार हे बारामतीतूनच लढतील हे निश्चित झालं आहे. 

रामराजेंचं काही ठरलं नाही, ते जाणार नाहीत

फलटणचे रामराजे निंबाळकर हे अजितदादांची साथ सोडून शरद पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, रामराजेंचा तसा कोणताही निर्णय झालेला नाही. अजितदादा हे कोल्हापूरला जाणार असून त्यावेळी ते रामराजेंची भेटही घेणार आहेत. त्यामुळे येत्या पाच सहा दिवसात मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहेत. निवडणूक जवळ आल्या की इकडे तिकडे होतच असतं. 

कागलच्या वादावर काय म्हणाले तटकरे? 

कागलमधून राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र विरेंद्र मंडलिक यांनी निवडणूक लढवण्याचं जाहीर केलं आहे. त्यावर बोलताना सुनील तटकरे म्हणाले की, त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय पातळीवर आणि राज्य पातळीवर काय चर्चा होतात हे काहींना माहीत नसावेत. त्यामुळेच त्यांनी त्या भावना व्यक्त केल्या आहेत. आमच्या महायुतीचे जागा वाटप फार पुढे गेला आहे. राहिलेल्या जागा वाटपाबाबत येत्या चार दिवसात तिढा सुटेल. 

भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळेच साहजिकच भाजपला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं सुनील तटकरे यांनी सांगितलं. 

ही बातमी वाचा: 

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime News: आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल; महायुतीतील वाद चव्हाट्यावर
Dattatray Bharne: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 'तारीख पे तारीख'! कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी कारणांसह नवी डेडलाईन सांगितली
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
केंद्र सरकारची घटका भरली, सभागृहात सामोरे जायला घाबरता आणि आम्हाला पळपुटे म्हणता? अमित शाह नालायक गृहमंत्री; पृथ्वीराज चव्हाणांचा प्रहार
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा, मुख्यमंत्र्यांचं लाडकी बहीण योजनेबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले.... 
लाडकी बहीण योजना काही झालं तरी बंद होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचा पुढचा प्लॅन सांगितला
Japan Rain: जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
जपानमध्ये एका महिन्याचा पाऊस फक्त तासाभरात पडला; 7 हजार लोक विमानतळावर अडकले, 45 हजार घरातील बत्ती गुल, 4 लाख लोकांना स्थलांतरितचे आदेश, अवघ्या 15 दिवसात तीन चक्रीवादळांचा तडाखा
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?

चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Embed widget