एक्स्प्लोर

सुजय विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांना भेटले, राजकीय चर्चांना उधाण

गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी दोघांची तासभर बैठक झाली. मात्र ही बैठक राजकीय नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. असे असले तरी ईडीची कारवाई टाळण्यासाठी सुजयला भाजपमध्ये पाठवत आहेत अशी टीका शिवसेनेने केली आहे.

मुंबई : विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. गिरीश महाजन यांच्या शिवनेरी या शासकीय निवासस्थानी दोघांची तासभर बैठक झाली. मात्र ही बैठक राजकीय नसल्याचे दोघांनीही स्पष्ट केले. असे असले तरी ईडीची कारवाई टाळण्यासाठी सुजयला भाजपमध्ये पाठवत आहेत अशी टीका शिवसेनेने केली आहे.
WATCH VIDEO : डॉ. सुजय विखे पाटील आणि  मंत्री गिरीश महाजन यांची भेट 
राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन, माझ्याकडे ते खातंच आहे : गिरीश महाजनांचं सूचक विधान 
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून सुजय विखे पाटील इच्छुक आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस जागा सोडत नसल्याने सुजय हे भाजपकडून चाचपणी करत असल्याचे बोलले जात होते. मात्र आजच्या बैठकीत सुजय विखे पाटील यांच्यासोबत कुठलीही राजकीय चर्चा नाही तर त्यांच्या मेडिकल कॉलेज मधल्या पीजी विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय प्रवेशाबाबत चर्चा झाली, असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले. पण राजकारणात सध्या काहीही होऊ शकतं. आजकाल कोणीही कुठेही जातं. उत्तरप्रदेशात पाहिलं तर नेताजी मुलाच्या विरोधात आहेत. आता प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. राजकीय शस्त्रक्रियेची संधी आलीच तर नक्की करेन, माझ्याकडे ते खातंच आहे, असे सूचक विधान गिरीश महाजन यांनी केले. माझ्याकडचा पेशंट सहसा बरा होऊनच जातो, याची आपल्याला कल्पना असेलच, असेही महाजन यावेळी म्हणाले.
WATCH VIDEO | नगरच्या जागेसाठी विखे पितापुत्राचं दबावतंत्र | मुंबई | एबीपी माझा
तर मी वर्षावर वर गेलो असतो : सुजय विखे पाटील
राजकीय चर्चा करायची असती तर मी वर्षावर वर गेलो असतो. गिरीश महाजन यांना कॉलेजच्या विषयासाठी भेटलो असल्याचे सुजय विखे पाटील यांनी सांगितले. या भेटीत राजकीय काही नाही. गिरीश महाजन ज्येष्ठ आहेत. नेहमीच मार्गदर्शन करत असतात. नेहमी मदत करतातआणि मदत केली आहे. मी डॉक्टर आहे आहे, मी स्वत: माझं औषध तयार करीन, असेही ते महाजन यांच्या 'पेशंट' वाल्या वक्तव्याला उत्तर देताना म्हणाले. मी स्वतंत्र व्यक्ती आहे. वडिलांनी स्वातंत्र्य दिलं आहे,  मी माझा निर्णय घेऊ शकतो, असेही ते म्हणाले.
ईडीची पीडा टळो म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनी सुजयला भाजपत पाठवलं का? : शिवसेना 
राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्यावरील आणि त्यांच्या परिवारावरील ईडीची कारवाई थांबवण्यासाठी सुजय यांना भाजपमध्ये पाठवले का? असा टोला शिवसेना प्रवक्ता आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे. तसेही राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्ष नेते कमी आणि शासनाचे दूत म्हणूनच कार्यरत होते, हे आपण गेले काही वर्ष अनुभवले आहेच, भाजप शासनाची विरोधी पक्ष नेत्यांनी मदत करण्यामागेही त्यांचा एक पाय भाजपत तर एक कॉंग्रेसमध्ये अशी अवस्था असण्यामागेही त्याना आपल्यावर ईडीची करवाई तर होणार तर नाही ना अशी भीती वाटत तर नव्हती ना, असेही त्या म्हणाल्या.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bandra Railway Accident Special Report : प्रवाशांची गर्दी,चेंगरा-चेंगरी  वांद्रे स्टेशनवर काय घडलं?ABP Majha Headlines : 11 PM : 27 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTop 25 | टॉप 25 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा 27 OCT 2024 ABP MajhaMaha Vikas Aghadi Special Report : पुण्यात ठाकरे गटाची शरद पवार गटावर नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
भरत गोगावलेंना मोठा धक्का, माजी आमदाराच्या मुलाचा ठाकरे गटात प्रवेश, स्नेहल जगताप यांची ताकद वाढली
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Video : डोळ्यात पाणी, हाती रुमाल; भरसभेत सुजय विखे भावूक, म्हणाले आता रडायचं नाही, लढायचं
Congress Candidate List: काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
काँग्रेसची 14 उमेदवारांची 4 थी यादी, पंढरपुरात सरप्राईज उमेदवारी; शिवसेनेकडून घोषित जागेवरही नवा चेहरा
Tuljapur VidhanSabha Election : राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राणाजगजितसिंह पाटील की धीरज पाटील? तुळजापूर विधानसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार?
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
राष्ट्रवादीला जागा सुटली, जागा विकल्याचा आरोप; शिवसेना पदाधिकाऱ्यांची संजय राऊतांविरुद्ध घोषणाबाजी
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
वांद्रे स्थानकावरील घटनेनंतर जाग; दिवाळीतील गर्दी नियंत्रणासाठी रेल्वेचा मोठा निर्णय
Sambhajiraje Chhatrapati : संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
संभाजीराजे म्हणाले, कोल्हापूरमधून निवडणूक लढवणार नाही, पण या दोन मतदारसंघात इच्छूक! दोन दिवसात निर्णय घेणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
नितेश राणेंविरुद्ध मुस्लीम नेत्यानं ठोकला शड्डू; सर्वधर्म समभावाचा संदेश देऊन विधानसभा लढणार
Embed widget