एक्स्प्लोर

हिंगोलीत विवाहितेची गळफास लावून आत्महत्या, बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमधून उघड

हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखऱ्यात विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी विवाहितेवर बलात्कार झाल्याचं सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. आरोपी ब्लॅकमेल करत असल्याने विवाहितेने आत्महत्या केल्याचा आरोप नोटमध्ये करण्यात आला.

हिंगोली : हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील साखरा येथे विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. विवाहितेवर बलात्कार झाल्याचं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमधून समोर आलं आहे. आरोपी ब्लॅकमेल करत असल्याचं महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहिलं आहे. गरोदरपणातही आरोपींनी आपल्यावर बलात्कार केल्याचं महिलेने लिहून ठेवलं आहे.

याप्रकरणी आधी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर महिलेच्या हातात सुसाईड नोट सापडल्याने तिच्या पतीच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रभान गणपत कायंदे, परमेश्वर नारायण वावरे, सुरेश नामदेव कायंदे अशी आरोपीची नावं आहेत. तिन्ही आरोपींविरोधात कलम 376 (2)(एच), कलम 376 (डी), कलम 306, कलम 506, कलम 452, कलम 34 आणि सह कलम 66 (ई) आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. हे तिन्ही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी 22 डिसेंबर 2015 मध्ये महिलेच्या घरात जबरस्तीने घुसले होते. त्यानंतर घरात घुसून त्यांनी तिच्यावर बलात्कार केला होता. ज्यावेळी तिच्यावर अत्याचार झाला त्यावेळी ती दोन महिन्यांची गर्भवती होती. या बलात्काराचा आरोपींनी व्हिडीओ तयार केला होता. हा व्हिडीओ गावात दाखवून आरोपी महिलेची बदनामी करत होते. या त्रासाला कंटाळूनच आणि आपल्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्यानेच आपण आत्महत्या करत असल्याचं महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं.

तिन्ही आरोपींची चौकशी करुन त्यांना शिक्षा द्यावी. मरताना व्यक्ती खरं बोलतो, तसं मीही खरं बोलत आहे. मी माझ्या मनानेच फाशी घेत असून त्या तिघांना सजा व्हावी, अशी माझी इच्छा आहे. या शिक्षेमुळे पुन्हा गावात कुणी गैरकृत्य करणार नाही, असं आत्महत्येपूर्वी महिलेने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं होत. पोलिसांनी ही सुसाईड नोट ताब्यात घेतली असून आरोपींचा शोध सुरु आहे.

संबंधित बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
धक्कादायक! शिवसेना शिंदे गटाच्या माजी नगरसेवकाकडून विमानतळावरच गोळीबार, दोन जण जखमी, नेमकं प्रकरण काय?
Manoj Jarange Patil: 'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा
'मराठ्यांपुढे सत्तेचं शहाणपण जमत नाहीत, आता आमच्या बाया चपला काढतील'; मनोज जरांगेंचा इशारा

व्हिडीओ

Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
Rohit Pawar : उद्योजकांनी प्रेस घेतल्यावर गडबड झाली, उद्योगमंत्री रविवारी चाकणमध्ये गेलेत, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
उदय सामंतांची चाकण एमआयडीसीत रविवारी बैठक, एवढ्या दिवस काय गोट्या खेळत होते का? : रोहित पवार
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
अमित ठाकरेंच्या भेटीनंतर मुंबईतील फ्लॅट एजंट भावेश कावरेची माफी; म्हणाला, मला शब्दाला शब्द वाढवायचा नाही
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
चार वर्षांपासून गर्लफ्रेंड, घरात लग्नाची बोलणी सुरु असतानाच दोस्ताच्या कारमध्ये दिसली; बाॅयफ्रेंड थांबवण्यासाठी धावत्या कारच्या बोनेटवर चढला अन् 200 मीटरवर चिरडून जीवानिशी गेला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 ऑगस्ट 2026 | रविवार
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
उपचाराच्या नावाखाली तंत्र-मंत्र करत मौलवीचा महिलेवर अत्याचार; युपीला पळून जाण्याच्या तयारीत, पोलिसांनी उचलला
Prithviraj Chavan : गोपीनाथ मुंडेंबाबत माझ्या मनात आदर, ते काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ची निवडणूक जिंकलो असतो : पृथ्वीराज चव्हाण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये आले असते तर 2014 ला हारलो नसतो, मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचं नाव सुचवलं असतं: पृथ्वीराज चव्हाण
Revanth Reddy: काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
काँग्रेस सरकारला बदनाम करण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडूतील मंदिरांना भेट देत तंत्र-मंत्र विधी केल्याचा आरोप
Embed widget