एक्स्प्लोर

मराठा आरक्षणासाठी पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या; बीड जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Beed News : रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

बीड: जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली येथील एका तरुणाने मराठा आरक्षण देण्याची मागणी करत, पाण्याच्या टाकीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.

मराठा आरक्षण देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला होता. तिथे काही काळ शत्रुघ्न याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच हजर झालेल्या पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने रात्रीच्या सुमारास टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. 

पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन...

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून राज्यभरात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात येत आहे. बीड जिल्ह्यात देखील गावागावात आंदोलन सुरु आहे. दरम्यान, अंबाजोगाई तालुक्यातील गिरवली गावातील शत्रुघ्न काशीद या तरुणाने देखील आपल्या गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केले होते. मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी त्याच्याकडून करण्यात आली. तर, पाण्याच्या टाकीवर चढल्यावर त्याने आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली. तसेच जरांगे पाटील यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. तसेच, पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. मात्र तो आपल्या मागणीवर ठाम राहिला. अखेर रात्रीच्या सुमारास त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले. 

शासन आपल्या दारी कार्यक्रम बंद पाडला...

महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेण्यात येणारा तालुकास्तरीय शासन आपल्या दारी हा कार्यक्रम पाटोदा येथे आयोजित करण्यात आला होता. याची तयारी चालू असतानाच मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांनी कार्यक्रम घेण्यास विरोध केला. पाटोदा तहसील कार्यालयाच्या आवारातच मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी साखळी आंदोलन सुरू आहे.  त्यामुळे हा कार्यक्रम पाटोदा कॉलेजमध्ये ठेवण्यात आला होता. मात्र, आंदोलकांनी कॉलेजमध्ये जाऊन हा कार्यक्रम बंद पाडला. तसेच जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत पाटोद्यात कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ देणार नाही असा पवित्रा घेतला.

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षण! मराठवाड्यातील आत्महत्या सत्र सुरूच; धाराशिव जिल्ह्यात एकाने गळफास घेऊन संपवलं जीवन

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
Vasai News: हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
हातात एक वर्षाची चिमुकली, स्कूटीवरून प्रवास; वाऱ्याने केस विस्कटले, आई केस बांधत असतानाच अनर्थ घडला, वसईतील काळीज पिळवटून टाकणारी घटना
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक
धक्कादायक! अहिल्यानगरमध्ये महापालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू; चौघांना अटक

व्हिडीओ

Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
तुकाराम मुंढेंनी पुण्यात जिथं पहिल्यांदा चायनीज खाल्लं; धाड टाकण्याबाबत काय म्हणाले, हॉटेलचे मालक
फुटबाॅलचा बादशाह लिओनेल मेस्सीचे वडील जॉर्ज यांचे निधन; मेस्सीला घडवण्यासाठी दोन दशकांहून अधिक काळ सावलीसारखी साथ

Embed widget