एक्स्प्लोर
शिवसेना-भाजपने एकमेकांवर टीका टाळावी : मुनगंटीवार
नागपूर : शिवसेना-भाजपने एकमेकांवर टीका-टिपणी करु नये, असं गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ठरल्याचं सूतोवाच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. शिवसेनेने भाजपवर टीका करायला नको, असं म्हणत मुनगंटीवारांनी शिष्टाईचे प्रयत्न केले आहेत.
'शिवसेना आणि भाजप यांनी एकमेकांवर टीका-टिपणी करु नये. शिवसेनेने टीका करायला नको. एकमेकांवर टीका करणं अयोग्य आहे. यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होतो', असं मतही मुनगंटीवारांनी व्यक्त केलं आहे.
'काँग्रेस-राष्ट्रवादीने अशाचप्रकारे एकमेकांवर टीका केली होती, त्यामुळे त्यांचा पराभव झाला. सेना-भाजपने आपापसात टीका टाळायला हवी', असं आवाहन मुनगंटीवारांनी केलं. गेल्या आठवड्यात बैठक झाली असून पुढील आठवड्यात यासंबंधी पुन्हा बैठक होणार
आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
'शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी याबाबत जिल्हा स्तरावर निर्णय होतो, मुंबईमध्ये युती व्हावी ही भाजपची इच्छा आहे. युतीबाबत शिवसेनेची कुठलीही अट मला समजलेली नाही', असंही सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
संबंधित बातम्या :
स्थानिक स्वराज्यसंस्थेत शिवसेना स्वबळावर, भाजपशी युती नाही: सूत्र
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement