एक्स्प्लोर

खडसेंचं उंदीर घोटाळ्याचं गणित मुनगंटीवारांनी सोडवलं

मुनगंटीवार आज शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

शिर्डी (अहमदनगर): मंत्रालयातील उंदीर घोटाळ्यावरुन सरकारवर टीका करणाऱ्या एकनाथ खडसेंना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अप्रत्यक्षरित्या टोमणा लगावला. मुनगंटीवार आज शिर्डीत साई दर्शनासाठी आले होते. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. मंत्रालयात उंदीर मारण्यासाठी काही गोळ्या ठेवण्यात आल्या होत्या. याचा अर्थ प्रत्येक गोळी खाऊन उंदीर मेला असा होत नाही. याचा चुकीचा अर्थ काढणाऱ्यांना देव बुद्धी देवो असं म्हणत नाव न घेता मुनगंटीवारांनी खडसेंना प्रत्युत्तर दिलंय. एकनाथ खडसेंनी दोन दिवसांपूर्वी विधानसभेत उंदीर मारण्याचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. त्यानंतर पहिल्यांदाच सरकारकडून प्रतिक्रिया आली आहे. मुनगंटीवार काय म्हणाले? "फाईल कुरतडू नये म्हणून काही औषधं ठेवली जातात. तीन-साडेतीन लाख टॅबेलट, ज्याची किंमत एक-दीड रुपये आहे, अशा सुमारे चार लाखाच्या टॅबलेट मंत्रालयात ठेवण्यात आल्या. त्यातून अर्थ असा काढण्यात आला की, जिथे एक टॅबलेट ठेवलीय, ती उंदराने खाल्लीच पाहिजे आणि तो मेलाच पाहिजे. आपल्याकडे कसा असा अर्थ काढला जातो, भगवान साईबाबा त्यांना सदबुद्धी देवो....अर्थ काढण्याचं काम सर्व राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी योग्य पद्धतीने केलं पाहिजे. जिथे टॅबलेट ठेवल्या, तेवढे उंदीर मेले, तेवढ्या उंदरांची विल्हेवाट कशी लावली, तासाला किती उंदीर मेले....जेवढ्या टॅबलेट ठेवल्या तेवढे उंदीर मेलेच पाहिजे, असा अर्थ काढणं योग्य नाही", असं मुनगंटीवार म्हणाले. आधीच जनतेचा व्यवस्थेवर विश्वास कमी झाला आहे, त्यातच असे वक्तव्य करुन विश्वास अजून कमी करु नका असा, अप्रत्यक्ष सल्ला मुनगंटीवार यांनी खडसेंना दिला. काँग्रेस राष्ट्रवादीच्या धोरणामुळे राज्यावर कर्जाचा डोंगर उभा राहिला हे खरं असलं तरी, आम्ही तो डोंगर कमी करण्यात यशस्वी झालो आहे. महसुली तुटीत सुद्धा आम्ही ऋणभार कमी केला आहे. कर्जाचा आकडा जरी जास्त दिसत असला तरी राज्याचे उत्पन्न त्या तुलनेत वाढलं आहे, असा दावा मुनगंटीवार यांनी केला.

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप

VIDEO: संबंधित बातम्या  मंत्रालय नव्हे उंदरालय, शिवसेनेचं टीकास्त्र

मंत्रालयात मोठा उंदीर घोटाळा, खडसेंचा नवा आरोप

उंदीर घोटाळा : कंत्राट दिलेली सहकारी मजूर संस्थाच अस्तित्त्वात नाही  

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Maharashtra Live News Updates: मुंबईतील मोकळ्या जागा आणि क्रीडांगणं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेचं आज आंदोलन
Sagar Mali Passes Away: मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
मुंबईचा ‘ज्युनियर रॉनी कोलमन’ काळाच्या पडद्याआड; शरीरसौष्ठवपटू सागर माळीचे वयाच्या 38 व्या वर्षी निधन
Pune News : पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई अखेर रद्द, नेमकं प्रकरण काय?
पोषण आहाराचा निकृष्ट दर्जा दाखवणाऱ्या पुण्यातील 'त्या' अंगणवाडी सेविकेला अखेर दिलासा, टीकेची झोड उठताच सेवामुक्तीची कारवाई रद्द, नेमकं प्रकरण काय?
Chatro Ki Gunj Pune : 'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात
'तु जाने ना...' गाण्यावर प्रणिती शिंदे, विशाल पाटलांसह काँग्रेसचे सगळेच नेते थिरकले; राहुल गांधींचा पुण्यातील ‘छात्रों की गुंज’चा शेवट जल्लोषात

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget