Sangli: मर्दानी खेळादरम्यान थरार, डोक्यानं नारळ फोडताना निसटला, राज्यमंत्री विश्वजीत कदमांच्या खांद्यावर आदळला!
Sangli: कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या हस्ते सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवामध्ये (Walwa) राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं.
Sangli: कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांच्या हस्ते सांगली (Sangli) जिल्ह्यातील वाळवामध्ये (Walwa) राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आलं. या स्पर्धेदरम्यान विश्वजित यांच्यासोबत विचित्र अशी घडना घडली आहे. हवेत नारळ उडवून तो डोक्याने वरच्या वर फोडण्याची कसरत हलगीवादक करीत होता. दरम्यान, हलगीवादकानं 20 फुट उंचीवर फेकलेला नारळ हा खेळ पाहण्यासाठी गर्दीत बसलेल्या विश्वजित कदम यांच्या दिशनं उडाला. त्यावेळी विश्वजित कदम यांनी डोकं बाजूला केल्यानं नारळ त्यांच्या खांद्यावर पडला.
विश्वजित कदम यांच्या हस्ते खोखो स्पर्धेचं उद्घाटन
सांगली येथील वाळवामध्ये राज्यस्तरीय खोखो स्पर्धेचे उद्घाटन राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मैदानात एक हालगीवादक कलाकार हालगीच्या तालावर कसरतीचे खेळ करत होता. हवेत नारळ उडवून तो डोक्याने वरच्या वर फोडण्याची कसरत हलगीवादक करीत होता. नारळ फोडण्याचा एक प्रयत्न फसल्यानंतर पुन्हा त्या कलाकाराने नारळ वरती फेकला आणि वर भिरकावेला हा नारळ सुमारे 20 फूट उंचीवरून कलाकाराच्या डोक्यावर फुटलाच नाही.
नारळ विश्वजित कदम यांच्या खांद्यावर आदळला
हा नारळ समोरच गर्दीत हा खेळ पाहणारे राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम यांच्या दिशेनं उडाला. क्षणातच विश्वजित कदम यांनी डोकं बाजूला केलं आणि नारळ त्यांच्या खांद्यावर पडला. त्यामुळं डोक्यावर बेतलेलं खांद्यावर निभावलं अशी अवस्था कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची झालेली पाहायला मिळाली.
पाहा व्हिडिओ-
हे देखील वाचा-
- Sambhajiraje : संभाजीराजेंचा राज्यसभेचा मार्ग मोकळा? निवडणुकीसाठी शरद पवार यांचा पाठिंबा असल्याचा दावा
- Narayan Rane: अडीच वर्षात किती चुली पेटवल्या? तुम्ही मराठी तरुणांच्या हातात दगड दिले; नारायण राणेंचा उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघात
- Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी शून्य कोरोना मृत्यूची नोंद, तर सक्रिय रुग्ण संख्या 1500 पार