एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सांगली आणि अहमदनगरला शिवशाही बसवर दगडफेक
सांगली आणि अहमदनगरमध्ये शिवशाही या वातानुकूलित बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. अहमदनगरला झालेल्या दगडफेकीत चालकाला मार लागला आहे.
सांगली/अहमदनगर : एसटी संपाच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी हिंसक घटना घडल्या. सांगली आणि अहमदनगरमध्ये शिवशाही या वातानुकूलित बसवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. अहमदनगरला झालेल्या दगडफेकीत चालकाला मार लागला आहे.
नगर शहरातून बस बाहेर पडल्यावर नेप्ती नाका परिसरात दगड फेकला. दुचाकीवरुन आलेल्या अज्ञाताने साडेसहाच्या दरम्यान दगडफेक केली. ही बस तारकपूर डेपोची असून कल्याणला जाताना दगड भिरकावला.
या दगडफेकीत बसची काच फुटल्याने काही काचेचे तुकडे काही जणांच्या डोळ्याला धडकले. मात्र हा दगड चालक अनिल वारे यांच्या खांद्यावर आदळला. या नंतर ही बस तारकपूर डेपोत आणून पंचनामा करण्यात आला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. समाजकंटकांनी शिवशाही बसला लक्ष्य केल्याने एसटी कामगारांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर दगडफेक झाल्याची शंका आहे.
सांगलीतही शिवशाही बसवर दगडफेक
एसटी कर्मचाऱ्यांच्या अघोषित संपाला दुसऱ्या दिवशी सांगलीत हिंसक वळण लागलं. वाळवा नजीक पुण्याहून सांगलीकडे येणाऱ्या शिवशाही बसवर दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर तासगाव तालुक्यातील पुणदी गावाजवळ सांगलीहून आटपाडीला जाणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यात बस चालकासह एक प्रवासी जखमी झाला.
शिवसेना प्रणित एसटी कामगार सेनेचे कर्मचारी या संपात सहभागी झालेले नाहीत. त्यांच्याद्वारे जिल्ह्यातील अनेक भागात एसटीने वाहतूक करण्याचं काम चालू आहे. यातीलच एक बस सांगलीहून आटपाडीला जात होती. यावेळी दगडफेकीची घटना घडली.
दरम्यान संपात सहभागी होण्यासाठी एसटी सोडून गेलेल्या सांगली जिल्ह्यातील एकूण 40 कर्मचाऱ्यांवर निलंबनाचे आदेश दिले आहेत. एसटी महामंडळाने सांगलीच्या विभाग नियंत्रकांना हे आदेश दिले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement