एक्स्प्लोर
जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळया येथे ही घटना घडली. या हल्ल्यात पोलीस उपाधीक्षकांसह सात पोलीस जखमी झाले आहेत.
![जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी stone pelting on police in Dhule seven injured including DySp जमावाच्या दगडफेकीत डीवायएसपींसह सात पोलीस कर्मचारी जखमी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/05/02100825/police.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
धुळे : कौटुंबीक वाद सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केल्याची घटना आज दुपारी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील दुर्बळया येथे घडली. या हल्ल्यात पोलीस उपाधीक्षकांसह सात पोलीस जखमी झाले आहेत.
चिंतेची बाब म्हणजे जखमी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये गरोदर महिला पोलीस कॉन्स्टेबलचाही समावेश आहे.
दुर्बळया येथे काही दिवसांपूर्वी एका पुरुषाने आत्महत्या केली. त्याच्या नावावरील मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या कारणावरुन त्याचे आई-वडील आणि सासरच्या मंडळीत वाद सुरु होता.
एपीआय किरणकुमार खेडकर यांच्या मध्यस्थीनंतर दोन्ही पक्षांनी सामोपचाराने तोडगा काढण्याचं मान्य केलं. मात्र नंतर पुन्हा वाद उफाळल्याने आज गावात आदिवासी समाज आणि दोन्ही पक्षांची बैठक घेण्याचं निश्चित करण्यात आलं.
बैठकीत बंदोबस्त ठेवण्यासाठी डीवायएसपी संदीप गावित, एपीआय किरणकुमार खेडकर हजर होते. बैठक सुरू असतानाच तेथील महिलांच्या जमावातून पोलिसांवर अचानक दगडफेक सुरू झाली. त्यातून सावरत नाहीत तोच पुरुषांचा जमाव लाठ्याकाठ्या घेऊन पोलिसांवर धावून गेला.
या हल्ल्यात डीवायएसपी संदीप गावित, एपीआय किरणकुमार खेडकर यांच्या हातावर मार लागला. हवालदार संजय नगराळे, श्यामसिंह वळवी, अनंत पवार हे मारहाणीत जखमी झाले. त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
महिला कर्मचारी यमुना परदेशी या गरोदर असून जमावाने ढकलून दिल्यामुळे गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या हल्ल्यानंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे तसेच हल्ला करणाऱ्यांना अटक करण्याची कारवाई सुरु होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)