एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, नवी यादी दिल्ली दरबारी
शिवसेनेचा कोटा संपला असला, तरी अधिकची दोन मंत्री पद देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, दसरा मेळाव्यानंतर विस्तार करण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी आहे.
![राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, नवी यादी दिल्ली दरबारी State Ministry expansion list ready, says sources राज्य मंत्रिमंडळ विस्ताराची यादी तयार, नवी यादी दिल्ली दरबारी](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/01/17130100/CM-Devendra-Fadnavis-2-768x576.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याची यादीही भाजपने तयार करुन दिल्लीत वरिष्ठांकडे पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे म्हटले जातेय. निवडणुकीला पूरक ठरतील असे बदल मंत्रिमंडळात केले जातील. भाजपच्या दोन ते तीन कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांना मंत्रिमंडळ विस्तारात डच्चू मिळणार असल्याची माहिती मिळतेय.
राज्याचे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांचा मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राजीनामा घेण्याची शक्यता आहे. मात्र, उद्धव ठाकरेंची परवानगी असल्यास पुन्हा शपथ देऊन मंत्री पद दिले जाईल.
शिवसेनेचा कोटा संपला असला, तरी अधिकची दोन मंत्री पद देण्याचा विचार सुरु आहे. मात्र, दसरा मेळाव्यानंतर विस्तार करण्यात यावा अशी शिवसेनेची मागणी आहे.
त्यामुळे आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार आणि कुणाला डच्चू मिळणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळासह सर्वांनाच लागली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
फॅक्ट चेक
क्राईम
जालना
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)