एक्स्प्लोर

Nalasopara Crime News: नालासोपारा प्रकरणात आणखी एका युवतीची तक्रार; वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप

Nalasopara Crime News: नालासोपारा येथील आरिफ आयुब शेखविरोधात मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आणखी एका 21 वर्षीय युवतीने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Nalasopara Crime News नालासोपारा: नालासोपारा येथील आरिफ आयुब शेख (Arif Shaikh) याच्याविरोधात मंगळवारी 13 ऑक्टोबर रोजी सायंकाळी आणखी एका 21 वर्षीय युवतीने नालासोपारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, आरोपीने ऑगस्ट 2023 पासून जून 2026 पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी भेटून शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. तसेच जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप युवतीने केला आहे. याशिवाय, खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद आहे.

एफआयआरनुसार, आरोपीने पीडित युवतीशी सोशल मीडिया ॲप्लिकेशनच्या माध्यमातून संपर्क साधला होता. त्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. 2 सप्टेंबर 2023 रोजी आरोपीने युवतीला भेटण्यासाठी बोलावून नालासोपारातील राजोडी जवळील एका लॉजमध्ये नेले. तेथे तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यानंतर 13 जानेवारी 2024 रोजी विरार पश्चिम परिसरातील आणखी एका लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (Nalasopara Crime News)

वारंवार भेटून शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप- (Arif Shaikh Nalasopara Case)

आरोपीने युवतीच्या राहत्या परिसरातही वारंवार भेटून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. 23 जून 2026 रोजी आरोपीने पुन्हा तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे. युवतीच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिचे खासगी छायाचित्रे आणि व्हिडिओ काढले होते. ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणल्याचा आरोपही तिने केला आहे. या प्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३५१(२), ६४(२)(एम) आणि ७७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास नालासोपारा पोलीस करीत आहेत.

आरोपी आरिफ शेख याला 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी-

नालासोपारा प्रकरणातील आरोपी आरिफ शेख याला वसई न्यायालयाने 16 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मंगळवारी नालासोपारा पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि एसीपी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित प्रकरणाच्या तपासाबाबत पोलिसांकडून माहिती घेतली.पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी या प्रकरणात दोन डझनभराहून अधिक महिलांचे शोषण झाल्याचा दावा केला. तसेच, आणखी चार  युवती तक्रार देण्यासाठी पुढे येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आता या प्रकरणात आतापर्यंत दोन मुलींनी तक्ररी दाखल केल्या आहेत, आज नव्या तक्रारी दाखल होणार का, संबंधित युवती  पोलिसांसमोर येऊन आपली बाजू मांडणार का आणि तपासात आणखी कोणते खुलासे होणार, याकडे आज दिवसभर लक्ष लागले आहे.

नेमकं प्रकरण काय? (Nalasopara Crime News)

9 ऑक्टोबर रोजी नालासोपारा पश्चिमधील छेडानगर येथील वेबकॉर्न जिममध्ये व्यायामासाठी आलेल्या काही तरुणांसमोर आरोपीने नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी येणाऱ्या महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. यानंतर त्याच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली असता 30 हून अधिक अश्लील व्हिडीओ आणि आक्षेपार्ह सामग्री आढळल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला होता. आता या प्रकरणात 150 हून अधिक व्हिडीओ असल्याचा दावा समोर आला आहे. या व्हिडीओची संख्या आणि स्वरूप पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होणे अपेक्षित आहे. प्रदीप मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण निदर्शनास आल्यानंतर त्यांनी संबंधितांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. रात्री दहा वाजल्यापासून पहाटेपर्यंत थांबूनही एफआयआर दाखल करण्यात आला नसल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच पहाटे तीनच्या सुमारास अहमद मेमन नावाची व्यक्ती घटनास्थळी आली आणि आरोपीला तेथून घेऊन गेली, असा दावाही त्यांनी केला आहे. पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेल्या मोबाईलमधील कथित पुरावे नंतर डिलीट करण्यात आल्याचा गंभीर आरोप मिश्रा यांनी केला आहे. मोबाईल प्रशासनाकडे दिल्यानंतर त्यातील माहिती कशी हटवण्यात आली, याची चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. या प्रकरणात पोलिसांची भूमिका आणि संबंधित व्यक्तींच्या कथित सहभागाचीही तपासणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. आरोपीने काही युवतींना लक्ष्य करून त्यांच्याशी संपर्क साधून  त्यांच्याशी लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप या प्रकरणात समोर आल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे. कथित आक्षेपार्ह व्हिडिओ परदेशातील अश्लील संकेतस्थळांवर पाठवून त्यातून पैसे कमावले जात असल्याचाही आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, 12 ऑक्टोबर रोजी एका युवतीने आरोपीविरोधात बलात्काराची तक्रार दाखल केली  समोर आहे. सद्यस्थिती याबाबत अधिकृत माहिती कॅमेऱ्यासमोर देण्यास  पोलिस नकार देत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून डिजिटल पुराव्यांची तपासणी करावी, तसेच कथितरीत्या सहभागी असलेल्या सर्व व्यक्तींची चौकशी करावी, अशी मागणी प्रदीप मिश्रा यांनी केली आहे. 

संबंधित बातमी:

Nalasopara Crime News: गरबावरुन टिप्पणी, मोबाईलमध्ये मुलींचे 150 अश्लील व्हिडीओ, परदेशात विकल्याचाही आरोप; नालासोपारामधील भयंकर घटना

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
प्रदीप पूर्णेकर मृत्यू प्रकरण! माजी महापौर मिनाक्षी शिंदेंना चौकशीला बोलावणार? सुत्रांनी दिली महत्वाची माहिती
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Advertisement

व्हिडीओ

Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल
BJP Vs India Aghadi Special Report : इंडिया आघाडीच्या मोर्चावरून राजकीय वाद, दोन गुन्हे दाखल
Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PHOTO : MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
MPSC आंदोलन गाजवणारा विवेकानंद पाटील कोल्हापुरात, मूळ गावी जंगी स्वागत
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
सोशल मीडियावर बेडशीटची विक्री, सायबर फसवणुकीचा नवा फंडा; 1 कोटीची फसवणूक, दोन घटनांत तिघांना अटक
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Embed widget