एक्स्प्लोर
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत रुग्णालयात दाखल
बुलडाणा: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाल्यानं त्यांना बुलडाण्यातील चिखली येथील योगीराज रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
सदाभाऊ खोत शनिवार व रविवार बुलडाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. शनिवारी अकोला येथे त्यांनी सभा घेतली. त्यानंतर दुपारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात त्यांची कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या समवेत सभा पार पडली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथे सभा घेतली. ही सभा पार पडल्यानंतर ते चिखली येथे मुक्कामासाठी निघाले.
डोणगाववरून चिखलीला येत असताना अचानक त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांना चिखली येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं समजतं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बातम्या
राजकारण
भारत
Advertisement