एक्स्प्लोर
Advertisement
चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांकडून सुभाष देशमुखांच्या लोकमंगलला क्लीन चिट
राष्ट्रवादीचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर सभापतींनी याप्रकरणी माहिती घेऊ अस सांगितल्यामुळे विरोधक संतप्त झालं. विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर सभापतींनी विधान परिषद दहा मिनीटं तहकूब केली.
मुंबई : सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीला गैरव्यवहारप्रकरणी पदुम राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी क्लीन चीट दिली आहे. महत्तावाचं म्हणजे लोकमंगल सोसायटीबाबत एफआयआर दाखल असून चौकशी सुरु असतानाच राज्यमंत्र्यांनी क्लीन चिट दिली असल्याचं विधान परिषदेत सांगिलतलं.
लोकमंगल सोसायटीने कोणताही गैरव्यवहार केला नाही,उलट सरकारकडून घेतलेलं अनुदान परत देण्याचा ठराव पास करुन त्यांनी व्याजासकट पैसे परत केले असल्याचं गजब उत्तर राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी आज विधान परिषदेत दिलं.
राष्ट्रवादीचे विरोध पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणी आक्षेप घेतला आहे. चोर चोरी करत असताना अलार्म वाजला पण त्याचा चोरीचा हेतू होता असं म्हणतं या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. विधान परिषद सभापतींनी याप्रकरणी माहिती घेऊ अस सांगितल्यामुळे विरोधक संतप्त झालं. विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. अखेर सभापतींनी विधान परिषद दहा मिनीटं तहकूब केली.
लोकमंगल प्रकरणी पोलीस तपास सुरु आहे. तसेच लोकमंगलचा सल्लागार (consultant) फरार असून तो सापडत नसल्याची माहिती राज्यमंत्र्यांनी दिली आहे. असे असताना दुसरीकडे मंत्र्यांनीचं लोकमंगल मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीला गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चीट दिली आहे.
संबंधित बातम्या
लोकमंगलची खाती गोठवण्याची नोटीस, सुभाष देशमुखांच्या अडचणीत वाढ
सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणीत, 'लोकमंगल'वर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
बनावट कागदपत्रांच्या आधारे अनुदान, सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना झटका
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नागपूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement