एक्स्प्लोर
Advertisement
सरकारी प्रचारासाठी पालखी सोहळ्यात संवाद वारी कॅम्पेन
वारकऱ्यांच्याही प्रतिक्रिया सर्वेक्षणातून घेणार येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने मोठं बजेट ठेवलं आहे.
मुंबई : आषाढी वारीच्या काळात दोन्ही पालखी मार्गांवर राज्य सरकार आपल्या योजनांचा प्रचार करणार आहे. दोन्हीही दिंडी मार्गावर पहिल्यांदाच संवाद वारीचं आयोजन करण्यात आलं आहे. वारकऱ्यांना फडणवीस सरकारने आणलेल्या योजनांची संपूर्ण माहिती देण्याची मोहिम आखण्यात आली आहे.
माहिती आणि जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली. विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच आषाढी वारीदरम्यान राज्य सरकारच्या योजनांच्या प्रचाराची मोहिम राबवण्यात येणार आहे.
वारकऱ्यांच्याही प्रतिक्रिया सर्वेक्षणातून घेणार येणार आहेत. यासाठी राज्य सरकारने मोठं बजेट ठेवलं आहे. फडणवीस सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी दोन्हीही दिंडी मार्गासाठी दोन चित्ररथ, सहा एलईडी मोबाईल व्हॅन, प्रदर्शन कला पथक असा ताफा असेल.
या मोहिमेत सोशल मीडियाचा विशेष उपयोग केला जाईल. ऑडिओ जिंगल्स होर्डिंग्स घडी पत्रिकांचा वापर केला जाणार आहे. वारकऱ्यांकडून राज्य सरकारच्या कामगिरीचा प्रतिसाद घेण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिपची टीम नियुक्त करण्यात आली आहे.
पंढरीत सात दिवस सरकारी योजनांच्या प्रदर्शनाचा कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. जनतेला सरकारी योजनांबद्दल काय वाटतं याचं सर्वेक्षण करण्यासाठी सर्वाधिक निधीची तरतूद करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement