एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
31 ऑक्टोबरनंतर दुष्काळ जाहीर करणार : चंद्रकांत पाटील
ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली.
सांगली : राज्यातील बहुतेक जिल्हे सध्या भीषण दुष्काळाच्या छायेत आहेत. याच पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर नंतर दुष्काळ जाहीर करणार असल्याचं महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं. तसेच राज्यातील तब्बल 172 तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली.
ग्रामीण रुग्णालयाच्या भूमिपूजन कार्यक्रम आणि भाजप कार्यकर्ता मेळाव्यासाठी चंद्रकांतदादा पाटील सांगलीतील जतमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी दुष्काळ जाहीर करणार असल्याची माहिती दिली.
ज्या तालुक्यात 31 टक्के पेक्षा दुष्काळ असेल त्याच तालुक्यात दुष्काळ जाहीर करणार असल्याचे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. तसेच ज्या भागात दुष्काळ जाहीर केलाय त्या भागात काही सवलती त्यांनी जाहीर केल्या जातील. पण या गोष्टी 31 ऑक्टोबर नंतरच जाहीर केल्या होतील असेही पाटील म्हणाले.
दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सवलती
- लाईट बिल
- पाणी पट्टी
- जनावरांचा चारा
- शालेय फी
- टँकर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
करमणूक
करमणूक
Advertisement