एक्स्प्लोर

ओबीसी आरक्षणाची लढाई आता शिंदे-फडणवीस सरकारने लढावी : छगन भुजबळ

OBC reservation : शिंदे-फडणवीस सरकारने ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) लढाई आता सुप्रीम कोर्टात लढावी आणि आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे आवाहन राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी केले आहे.

मुंबई : "ओबीसी आरक्षणाची (OBC reservation) लढाई आता सुप्रीम कोर्टात लढायची आहे, शिंदे-फडणवीस सरकारने ती लढावी.  आम्ही योग्य काम केलं आहे. आता नवीन सरकारने योग्य काम करावं, आम्हाला खात्री आहे की आरक्षणासह निवडणुका होतील, असा विश्वास राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी व्यक्त केला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची मुंबईत बैठक झाली. या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी नव्या सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवावा असे आवाहन केले. "
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधी झाल्यानंतर ओबीसी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून ओबीसींची लढाई लढतो आहोत. ओबीसी आरक्षणाला ग्रहण लागलं आहे. या प्रश्नावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधला, अशी माहिती छगन भुजबळ यांनी यावेळी दिली.    

"ओबीसींना आरक्षण मिळण्यासाठी इम्पिरिकल डेटा आवश्यक आहे. त्यासाठी बांठीया आयोग नेमला असून त्यांनी चांगलं काम सुरू केलं आहे. मध्य प्रदेश प्रमाणे डेटा गोळा करून घ्या म्हणून सांगितलं आहे.  आम्ही मतदार यादीवरून डेटा गोळा केला. हा डेटा बांठीया कमिशनला आठ दिवसांपूर्वी दिला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जास्त जबाबदारी आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.  

दरम्यान, भाजच्या अनेक नेत्यांनी ओबीसी आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारला घेरलं होतं. चंद्रशेखर बावनकुळे यांनी तर सरकारमध्ये बसून काय झोपा काढता काय असा प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, ही आठवण करून देत आता छगन भुजबळ यांनी या सरकारने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा असे म्हटले आहे. 

काय म्हणाले होते बावनकुळे?
"ओबीसी  समाजाच्या बाबतीत गेल्या तीन वर्षांपासून महाविकास आघाडी सरकार टाइमपास करत आहे.   देवेंद्र फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे इम्पिरिकल डेटा चुकीच्या पद्धतीने तयार केला जातोय, हे राज्य सरकारमधील मंत्री विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ यांनी कबूल केले. असे असेल तर मग तुम्ही सरकारमध्ये बसून काय करत आहात? तुम्ही झोपा काढत आहात का?, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीला विचारला होता.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Rashmi Barve : अनुसूचित जातीच्या महिलेवर झालेला हा अन्याय आहे - रश्मी बर्वेAshok Chavan on Prakash Ambedkar  : मविआने प्रकाश आंबेडकरांना योग्य सन्मान दिला नाही - अशोक चव्हाणGovinda Speech Mumbai : ...म्हणून मी CM Eknath Shinde यांची शिवसेना निवडली, गोविंदाचं मराठीत भाषणThane Loksabha Election 2024 : ठाण्याच्या जागेवरून भाजप आणि शिवसेने रस्सीखेच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda Ahuja Joins Shiv Sena : CM Eknath Shinde यांच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत अभिनेता गोविंदा शिवसेनेत
Sanjay Gaikwad files Nomination : प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड लोकसभेच्या मैदानात
प्रतापराव जाधवांना पक्षातूनच दणका, संजय गायकवाड बुलढाणा लोकसभेच्या मैदानात
Aishwarya Abhishek on Aradhya Bachchan : बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
बच्चन कुटुंबापासून दूर होणार आराध्या; ऐश्वर्या-अभिषेकने घेतला महत्त्वाचा निर्णय
Sangli Loksabha : सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
सांगली, हातकणंगलेत कोण कोणाचा 'करेक्ट कार्यक्रम' करतंय? गल्ली ते दिल्ली एकच चर्चा रंगली!
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Mumbai Indians: मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा; हार्दिकच्या गटात इशान किशन, रोहितच्या गटात कोण?
Kavya Maran: हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
हसताना, रागवताना काव्या मारनला तुम्ही पाहिलं...; पण तिचा डान्स बघितला का?, पाहा Video
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Embed widget