एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा ‘डिजिटल’ होणार
भाईंदर : महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा शंभर टक्के डिजिटल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आज भाईंदरमधील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीमध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते धुळे, ठाणे गोंदिया, हिंगोली या जिल्ह्यांमधील डिजिटल शाळा अभियानाअंतर्गत शंभर टक्के डिजिटल झालेल्या शाळांच्या 30 शिक्षण अधिकरी आणि शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
महाराष्ट्र शासन आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधनी यांच्या सयुंक्त विद्यामाने डिजिटल शाळा अभियान राज्यस्तरीय प्रेरणा सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडे प्रबोधिनीचे उपाध्यक्ष खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे, शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार या वेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील खेड्या-पाडयातील सर्व शाळा डिजिटल करण्याचं लक्ष असून, यात स्थानिक गावकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचं विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement