Sula Vineyards : सुला विनयार्डस कंपनीला राज्य उत्पादन शुल्क विभागाची नोटीस, 116 कोटी भरण्याचे निर्देश
Sula Vineyards News : जगप्रसिद्ध सुला विनयार्डस कंपनीला (Sula Vineyards)तब्बल 116 कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात उत्पादन शुल्क मंत्र्यांनी विनयार्डसला नोटीस जारी केली आहे.
Sula Vineyards News : द्राक्षापासून वाईनची (wine) निर्मिती करणाऱ्या जगप्रसिद्ध सुला विनयार्डस कंपनीला (Sula Vineyards)तब्बल 116 कोटी रुपये भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासंदर्भात उत्पादन शुल्क मंत्र्यांनी विनयार्डसला नोटीस जारी केली आहे. या नोटिसला सुला विनयार्डस कंपनीकडून न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. महाराष्ट्र बिअर आणि वाईन उत्पादन नियम 1966 नुसार ही नोटीस बजावली आहे.
इतर राज्यातून वाईन मिश्रण आणून राज्यात वाईन उत्पादित केल्यानं व्याजसह कर लावण्यात आला आहे. मात्र अशीच नोटीस सन 2018 मध्येही देण्यात आली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्यानं राज्य सरकारनं स्थगिती दिली होती. तत्कालीन उत्पादन शुल्क मंत्र्यांनी दिलेली अंतरिम स्थगिती उठवित थकबाकी वसुलीची नोटीस बजवण्यात आलीय. याआधीही मागील सरकारच्या काळात सुलासह इतर वाईनरीला कर भरण्याच्या नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. ते प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर सरकारी आदेशाला स्थगिती देण्यात आली होती. मात्र, नवीन राज्य उत्पादन शुल्क मंत्र्यांनी स्थगिती उठवल्यानं पुन्हा एकदा नोटीस पाठवण्यात आली आहे. महाराष्ट्र निर्मित बिअर आणि वाईन नियम, 1966 अंतर्गत, कस्टम सीमा ओलांडून किंवा इतर राज्यांमधून आणलेल्या वाइनचे मिश्रण करुन महाराष्ट्रात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या वाईनवर उत्पादन शुल्क वसूल केला जातो. तो करण्यायोग्य आहे या आधारावर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे.
कंपनीकडून मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका दाखल
महाराष्ट्र निर्मित बिअर आणि वाईन नियम, 1966 अंतर्गत, कस्टम सीमा ओलांडून किंवा इतर राज्यांमधून आणलेल्या वाइनचे मिश्रण करून महाराष्ट्रात उत्पादित किंवा उत्पादित केलेल्या वाइनवर उत्पादन शुल्क वसूल केला जातो. तो करण्यायोग्य आहे या आधारावर कंपनीला नोटीस बजावण्यात आली आहे. सुलाने तशी माहिती मुंबई स्टॉक एक्स्चेंज (बीएसई)ला दिली आहे. कंपनीने तात्काळ मुंबई उच्च न्यायालयासमोर रिट याचिका दाखल करून या नोटिशीला आव्हान दिले आहे. कंपनीला कायदेशीररित्या सूचित करण्यात आले आहे की डिमांड नोटीस कायद्याने योग्य नाही. कंपनी या प्रकरणातील पुढील घडामोडींवर स्टॉक एक्सचेंज अपडेट करेल, असे सुला विनयार्ड्सने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे. 2003 मध्ये स्थापन झालेली सुला विनयार्ड्स ही भारतातील सर्वात मोठी वाइन उत्पादक आणि विक्रेता आहे. कंपनी लोकप्रिय ब्रँड वाइन देखील वितरीत करते. सुला ही डिसेंबर २०२२ मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली.
महत्त्वाच्या बातम्या: