पालघर सॅटेलाईट विमानतळाचे काम लवकर सुरू करा; मुंबई विमानतळावरील गर्दी पाहता मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
मुंबई विमानतळावर दिवसेंदिवस वाढती गर्दी पाहता दोन ते तीन धावपट्टी असलेलं विमानतळाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत.
पुणे : मुंबई विमानतळावरील वाढती गर्दी पाहता राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालघर सॅटेलाईट विमानतळाचं काम लवकर सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी संचालकांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत.
मुंबई विमानतळावर दिवसेंदिवस वाढती गर्दी पाहता दोन ते तीन धावपट्टी असलेलं विमानतळाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश दिले आहेत. पालघर जिल्ह्यात विमानतळासाठी जमीन उपलब्ध असल्याने लवकरात लवकर कामाला सुरुवात करण्याचे आदेश दिले आहे. पालघर विमानतळ झाल्यास मुंबई विमानतळावरील 50 टक्के भार कमी होण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीची संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत त्यांनी निर्देश दिले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील विमानतळ विकासासाठी शासन करत असलेल्या कृती आराखड्यातील कामे प्राधानान्ये पूर्ण करावीत. शिर्डी बरोबरच इतर जिल्ह्यातील सुरू असलेली विमान वाहतूक सेवा दर्जेदार असावी यासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास विकास कंपनीने लक्ष द्यावे. मिहान येथे सद्यस्थितीत सुरू असलेले प्रकल्पांची कामे गतीने करावीत. समृध्दी महामार्गामुळेही नजीकच्या जिल्ह्यात सुरू असलेल्या विमान वाहतुकीस चालना मिळेल त्यामुळे या भागातील प्रस्तावीत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत. कोल्हापूर-रत्नागिरी येथील विमानतळ विस्तारीकरणासाठी सुरू असलेली कार्यवाही,अमरावती विमानतळ धावपट्टीची लांबी वाढविणे ही कामे देखील गतीने करावीत.
यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने पूर्ण केलेल्या विमानतळांचे हस्तांतरण महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे करावे जेणे करून एकाच यंत्रणेकडे विमानसेवेच्या विकासाबाबत काम करता येणे सुलभ होईल असे ही संचालक मंडळाच्या बैठकीत ठरले
इतर महत्त्वाच्या बातम्या :
Indigo Flight : विमानतळावर दिव्यांग मुलाला विमानात चढण्यापासून रोखल्याने संतापले विमान मंत्री सिंधिया, म्हणाले...