एक्स्प्लोर

तुळजाभवानी मंदिरात नियोजनाअभावी चेंगराचेंगरीसारखी स्थिती, भोंगळ कारभाराचा भाविकांना फटका

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी पहाटे देवीदर्शनास येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला. महसूल, पोलीस विभाग निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने सुरक्षा व्यवस्था कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तुळजापूर : तुळजापूर मंदिर संस्थानच्या भोंगळ कारभाराचा फटका भक्तांना बसला आहे. चैत्रपोर्णिमेच्या पूर्वसंध्येला तुळजापुरात तीर्थकुंडात स्नानासाठी मोठी गर्दी झाली होती. मात्र इथं कोणतीही व्यवस्था आणि नियोजन नसल्यामुळे चेंगराचेंगरीसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शुक्रवारी पहाटे देवीदर्शनास येणाऱ्या भाविकांना मोठ्या प्रमाणात बसला. महसूल, पोलीस विभाग निवडणूक प्रक्रियेत गुंतल्याने सुरक्षा व्यवस्था कमी असल्याचे चित्र पाहायला मिळाले. चैत्रपोर्णिमेनिमित्ताने लाखो भाविक तुळजापुरात येतात. याबाबत माहिती असूनही मंदिर प्रशासनाकडून तीर्थकुंडात स्नानाच्या सोयी बाबतीत कुठलेही पाऊल न उचलल्याने  मंदिरात असणाऱ्या श्री कल्लोळ तीर्थकुंडात गुरुवार रात्री दहा वाजेपासून भाविकांची भलीमोठी गर्दी झाली होती. यावेळी कल्लोळ तीर्थकुंड अपुरे पडल्याने ही रांग टोळभैरव मंदिराकडील लहान गल्लीत गेल्याने गदारोळ उडाला. काही वेळ चेंगराचेंगरी होवून भाविकांचे श्वास कोंडले गेले.  या चेंगराचेंगरीत सापडलेल्या अनेक भाविकांनी तर दैव बलवत्तर म्हणून वाचल्याचे सांगितले.  या घटनेवेळी पोलिस  बंदोबस्त नसल्याची माहिती काही भाविकांनी दिली. गोंधळ वाढल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत तीर्थस्नान बंद केले. यामुळे अनेक भाविक स्नान न करताच बाहेरुनच देवीदर्शन घेवून रवाना झाले.

मागील 23 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mira Bhayandar News: रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
मीरा-भाईंदरमधील रहिवासी इमारतींमध्ये कुर्बानीवर बंदी; सत्ताधारी भाजपने महासभेत प्रस्ताव केला मंजूर, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडासह गुन्ह्याची तरदूद
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Mumbai Crime News: मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
मुंबई हादरली! दादरमध्ये मुलाने चाकूने वार करुन जन्मदात्या आईला संपवलं, एडवर्ड फर्नांडिस पोलिसांच्या ताब्यात
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Baba Ramdev on Kangana Ranaut: शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
शिक्षण काय, तारुण्य कसं गेलं, तिचे पहिले कारनामे काय काय होते? ही बिघडलेल्या डोक्याची लक्षणे..' बाबा रामदेव खासदार कंगनावर का भडकले??
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Embed widget