ST Workers Strike Live Updates : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक
Maharashtra ST Employee Protest : एसटी महामंडळाचे (MSRTC) शासनामध्ये विलनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी राज्यात संप पुकारला आहे.
LIVE
![ST Workers Strike Live Updates : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक ST Workers Strike Live Updates : एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/10/28/baf5545fd091f1517da1ae9695961afd_original.jpg)
Background
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. एसटी कामगारांना शासकीय सेवेत घ्यावं अशी मागणी करत काल मंत्रालयावर मोर्चासाठी निघालेल्या भाजप नेत्यांसह काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. भाजप नेते गोपीचंद पडळकर आणि किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं आणि नंतर आझाद मैदानात आणलं होतं. जोवर मागण्या पूर्ण होत नाहीत तोवर कर्मचारी मुंबई सोडणार नसल्याचं भाजप नेत्यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे कामावर रूजू न होणाऱ्यांविरोधात मोठ्या कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत.
ST Workers Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
संपकरी कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ आक्रमक झालं आहे. मुख्यमंत्र्यांसह परिवहन मंत्र्यांनी एसटी कामगारांना कामावर येण्याचं आवाहन केलंय. तर दुसरीकडे कारवाई सुरू ठेवलीये परवा 376 आणि काल 542 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे. एकूण 918 कर्मचाऱ्यांवर आतापर्यंत महामंडळाकडून कारवाई करण्यात आली आहे. कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर मोठ्या कारवाईचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत. कामावर हजर राहावे असे आवाहन संघटनांनी करावे. असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी आवाहन केलं आहे. तर महामंडळाच्या विलीनीकरण प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आझाद मैदानावरचे आंदोलन सुरू ठेवण्याचं भाजपनं म्हटलं. त्यामुळे आझाद मैदानावर मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी येण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे आज एस.टी.कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहे. मनसेनं यापूर्वीच एसटी कामगारांच्या आंदोलनाला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. एसटी महामंडळाकडून विभागीय नियंत्रकांना कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे थेट आदेश देण्यात आले आहेत. एसटीच्या विभागातल्या कोर्टाच्या अधिकारक्षेत्रात असणाऱ्या कामगार न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत. एसटी महामंडळाकडून जिल्ह्यातल्या कामगार न्यायालयात आज रिट याचिका दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना निलंबनाच्या कारवाईसोबतच आर्थिक भुर्दंडही सोसावा लागू शकतो. आंदोलनाच्या दिवसापासून आतापर्यंत एसटी महामंडळाचे 100 कोटींचे नुकसान झाले आहे.
एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण? अज्ञातांकडून 2 शिवशाही बसवर दगडफेक
महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज पाचवा दिवस आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा अनेक कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. यातच एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण मिळाल्याचं दिसू लागलंय. नाशिकच्या महामार्ग बसस्थानकातील 2 शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आलीय. एका बसची मागील काच फोडली तर दुसऱ्या बसचे लाईट फोडण्यात आली. दोन दुचाकींवर आलेल्या काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. दगडफेक केल्यानंतर आरोपी फरार झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झालेत. काही वेळापूर्वीच ही घटना घडल्याचं वृत्त आहे.
कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्माचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल: अनिल परब
आंदोलनात वेळ घालवू नका, कामावर परता, परिवहन मंत्री अनिल परब यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. काही कर्मचाऱ्यांना कामावर यायचं आहे पण भाजपचे कार्यकर्ते त्यांना कामावर येत नाहीत असा आरोप त्यांनी केला. कामावर येऊ इच्छिणाऱ्या कर्माचाऱ्यांना संरक्षण दिलं जाईल असंही ते म्हणाले.
अनिल परब यांच्या घराबाहेर आंदोलन, आंदोलनकर्त्या महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
परिवाहन मंत्री अनिल परब यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचं आंदोलन; आंदोलक महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
सांगली-:
सांगलीत संपकरी एसटी कर्मचाऱ्याचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन..
दोन दिवसांपूर्वी सांगली बस स्थानकासमोर सुरु असलेल्या एस टी कर्मचाऱ्याच्या आंदोलनात झाले होते सहभागी .आज सकाळी हृदयविकाराने झाले निधन..
राजेंद्र निवृत्ती पाटील वय 46 रा. कवलापूर असे त्यांचे नाव
जिल्हा स्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचार्यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे एसटी प्रशासनाचे निर्देश
जिल्हा स्तरावर संबंधित कामगार न्यायालयात संपकरी कर्मचार्यांच्या विरोधात दावे दाखल करण्याचे एसटी प्रशासनाचे निर्देश.
- संबंधित कामगार न्यायालयाने संप अवैध ठरविल्यास, संपकरी कर्मचार्यांच्या वर एसटी प्रशासनाकडून आर्थिक दंड ठोठावला जाऊ शकतो.
- काम नाही..तर वेतन नाही! या नियमानुसार कर्मचाऱ्यांचे एका दिवसाला आठ दिवसाचे वेतन कपात केले जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)