एक्स्प्लोर

राज्यात 2000 कोटींचा एसटी घोटाळा, सरकारला अंधारात ठेवून भाडेतत्त्वावर बस घेण्याचा निर्णय

महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व विभागांचा कार्यभार होता. याच काळात संबंधित कंपन्यांना इरादा पत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले.

Maharashtra ST Scam: राज्यात दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा झाल्याचं उघड झालं आहे. सरकारला अंधारात ठेवून एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतलाच समोर आला असून  राज्य परिवहन महामंडळाने 1310 एसटी बस भाडेतत्त्वावर देताना व्यवहारात ठेकेदारावर मेहेरबानी दाखवल्याचं बोललं जात आहे. भाडेतत्त्वावर बस घेण्याच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis)  यांनी स्थगिती दिली असून या पूर्ण प्रकरणात चौकशीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे.  हा व्यवहार वादाच्या भोवऱ्यात सापडला असून या निर्णयामुळे एसटी महामंडळाला सुमारे 2000 कोटींचा आर्थिक फटका बसला असण्याची शक्यता आहे. 

महायुतीचे नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर खातेवाटपापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सर्व विभागांचा कार्यभार होता. याच काळात संबंधित कंपन्यांना इरादा पत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले. मुख्यमंत्र्यांनी महामंडळाच्या कारभारावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे नाराजी व्यक्त केल्याचेही सांगण्यात येतंय.  या संपूर्ण घोटाळ्यात दोन हजार कोटींचे नुकसान होऊ शकते अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर भाडेतत्त्वावर गाड्या घेण्याचा निर्णय स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे.

दोन हजार कोटींचा एसटी घोटाळा उघड

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर परिवहन महामंडळाने 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्यासाठी निविदा दाखल केली होती. एसटी बस भाडेतत्त्वावर घेण्याची प्रचलित पद्धत मोडून विभागनिहाय गाड्या घेण्याऐवजी विभागाला तीन समुहात विभागून प्रत्येक समूहात 400 ते 450 याप्रमाणे 1310 गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला गेला. यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतला याची कल्पना नसल्याचे म्हटलंय. महामंडळात चुकीच्या गोष्टींना थारा दिला जाणार नाही. प्रवाशांच्या हिताच्या आणि फायद्याच्या निर्णयांनाच आमचं प्राधान्य असेल. यात तडजोड होणार नाही असेही त्यांनी वृत्त समूहाला सांगितले.

परिवहन मंडळाला बसणार 2000 कोटींचा फटका 

राज्य परिवहन महामंडळाने 1310 बस गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय सरकारला अंधारात ठेवून घेतल्याचं समोर आल्यानंतर या व्यवहारात परिवहन मंडळाला दोन हजार कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे. निविदा प्रक्रियांमध्ये सात वर्षांसाठी या गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेण्यात आल्याने ढोबळमानाने 2000 कोटींचा भुर्दंड महामंडळाला सहन करावा लागणार होता. तांत्रिक पात्रता निविदा आचारसंहिता मोडल्याचं यात समोर आलंय. आता या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी स्थगिती देण्यात आल्याचं सांगण्यात आलंय.

हेही वाचा:

देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' सरकारी योजनांचे पैसे आता थेट बँक खात्यात जमा होणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Koregaon Bhima Shaurya Din : कोरेगाव भीमामध्ये 207 वा शौर्यदिन,  5 हजार पोलिसांचा बंदोबस्तShegaon Gajanan Maharaj Mandir : नववर्षाचा उत्साह, शेगावमध्ये भाविकांची भल्या पहाटेपासूनच गर्दीTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 01 जानेवारी 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 01 जानेवारी 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suresh Dhas on Walmik Karad : अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
अधिकाऱ्याला उचलून खंडणीचा गोरखधंदाच! तर वाल्मिक कराडमध्ये 302 मध्ये येऊ शकतो, सुरेश धसांनी वाचला बीडमधील कारनामांचा पाढा
Mhada Lottery: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! नव्या वर्षात 3000 सदनिकांची लॉटरी, कुठे असणार घरं?
Mamata Banerjee : बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
बदला घेणार! बंगालमध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर सीएम ममता बॅनर्जी जेलमध्ये जाणार; भाजप नेत्याचा मोठा दावा
Datta Bharne on Dhananjay Munde : बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
बीड प्रकरणात धनंजय मुंडेंचा कुठलाही संबंध असण्याची शक्यता नसावी; मंत्री दत्तामामांकडून धनूभाऊंची 'पाठराखण'
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10  लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासन सज्ज, 8 ते 10 लाख अनुयायी येण्याचा अंदाज, 5000 पोलीस तैनात
Walmik Karad:कॉलेजमध्ये शर्टच्या मागे गोपीनाथ मुंडेंचा फोटो लावून फिरणाऱ्या वाल्मिक कराडांनी 'राखे'तून भरारी कशी घेतली?
धनंजय मुंडेंचा उजवा हात, प्रति पालकमंत्रीपदाचं बिरुद, वाल्मिक कराड अण्णा एवढ्या उंचीवर कसे पोहोचले?
Walmik Karad : दोन्ही बाजूनं 30 मिनिटं जोरदार युक्तिवाद,केज कोर्टात काय घडलं? सरकारी वकील अन् कराडांचे वकील काय म्हणाले?
खंडणीच्या तक्रारीत 2 कोटींचा उल्लेखचं नाही, वाल्मिक कराडांच्या वकिलांचा कोर्टात कोणता युक्तिवाद?
Walmik Karad: वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
वाल्मिक कराड प्रकरणात सरकारवर प्रेशर, देवेंद्र फडणवीसांनी बळी पडू नये: प्रकाश आंबेडकर
Embed widget