एक्स्प्लोर
नव्या वेतनवाढीवर एसटी कर्मचारी संघटना असमाधानी
एसटी प्रशासनाने ही वाढ एकतर्फी केल्याचा आरोप एसटीची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.
धुळे : नवीन करारानुसार एसटी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारापासून वेतनवाढीचा लाभ मिळणार आहे. मात्र कर्मचाऱ्यांमध्ये या वेतन वाढीसंदर्भात असलेल्या परिपत्रकातील मजकुरामुळे गोंधळाची स्थिती आहे.
नेमकी किती पगारवाढ आहे, कशी आहे, नवीन कर्मचारी, जुने कर्मचारी यांना वेतन वाढ कशी मिळणार, अशी ही गोंधळाची स्थिती आहे.
नव्या वेतनवाढीचा साधारणपणे एक लाख एसटी कर्मचाऱ्यांना लाभ मिळणार आहे. मात्र एसटी प्रशासनाने ही वाढ एकतर्फी केल्याचा आरोप एसटीची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केला.
परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी जाहीर केलेली वेतनवाढ मान्य न झाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी दोन दिवसीय संप केला होता. हा संप मागे घेण्याचं आवाहन करताना रावतेंनी आश्वासन दिलं होतं, की 4849 कोटी रुपयांमध्ये संघटनेने आपले सूत्र बसवावे. त्याप्रमाने संघटनेने 31/316 चे मूळ + 1190x2.57 हे सूत्र तयार करून दिलं होतं. तरीही एसटी प्रशासनाने हा एकतर्फी आदेश काढल्याचा आरोप संदीप शिंदे यांनी केला.
दरम्यान, जोपर्यंत आपल्या ठरलेल्या सूत्रानुसार वाढ होत नाही, तो पर्यंत करारावर सह्या केल्या जाणार नाहीत. याबाबत तातडीने कोअर कमिटीची बैठक बोलावण्यात आली असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement