एक्स्प्लोर

ST Bus Fare Hike : एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय

MSRTC Fare Hike : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने साध्या बसगाड्यांसाठी लागू केलेली 10 टक्के तात्पुरती भाडेवाढ आता 31 जुलै 2026 पर्यंत कायम ठेवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

MSRTC Fare Hike : एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (ST Mahamandal Maharashtra) साध्या बससेवा प्रकारासाठी लागू असलेली 10 टक्के परिवर्तनशील (हंगामी) भाडेवाढ येत्या 31 जुलैपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही कालावधीत डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महामंडळावर मोठा आर्थिक भार पडत आहे, हाच वाढता खर्च लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

एसटी महामंडळ ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी या लालपरीने प्रवास करतात. मात्र, डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे महामंडळाचा दैनंदिन इंधन खर्च कमालीचा वाढला असून त्याचा थेट फटका एसटीच्या आर्थिक स्थितीवर होत आहे. अशा बिकट परिस्थितीत प्रवाशांना अखंडित आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ कायम ठेवणे भाग पडल्याचे महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

MSRTC Ticket Rates : उन्हाळी हंगामातील भाडेवाढीला मुदतवाढ

महामंडळाने यापूर्वी उन्हाळी गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन साध्या बसगाड्यांच्या तिकिट दरात तात्पुरती 10 टक्के वाढ लागू केली होती. या भाडेवाढीची मुदत 15 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत संपणार होती. तथापि, सध्याची वाहतूक गरज, वाढती प्रवासी संख्या आणि इंधनाचा वाढलेला खर्च विचारात घेऊन या तात्पुरत्या भाडेवाढीस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

MSRTC Fuel Prices Impact : वाढत्या डिझेल दरांचा मोठा आर्थिक भार

गेल्या काही महिन्यांत डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळाच्या तिजोरीवर मोठा ताण पडत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे ही दरवाढ कायम ठेवण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे उद्दिष्ट प्रवाशांना सुरक्षित, नियमित आणि दर्जेदार सेवा देणे हेच आहे. मात्र, इंधन खर्चाचा हा वाढता ताण काही प्रमाणात कमी करण्यासाठी आणि एसटी सेवा विस्कळीत न होऊ देण्यासाठी प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

ST Bus Fare Hike Extended : 31 जुलैपर्यंत नवे दर लागू राहणार

एसटी महामंडळाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार, आता 31 जुलै 2026 रोजी रात्री 11 वाजेपर्यंत साध्या बससेवा प्रकारासाठी 10 टक्के परिवर्तनशील भाडेवाढ लागू राहणार आहे. यामुळे पुढील काही दिवस प्रवाशांना साध्या एसटी बसने प्रवास करताना वाढीव दरानेच तिकीट खरेदी करावे लागणार आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Maharashtra Live News Updates: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज पुन्हा सुनावणी
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nashik Crime News: 37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
37 वर्षांच्या हसीनाला नवा बॉयफ्रेंड मिळाला, 15 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्याला समजताच 'ती'ने मोठा गेम केला; बॉडी थेट कसारा घाटात आढळली, नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Aus vs Ban 2nd Test Squad Update : सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
सलामीवीर OUT, 3 वर्षांपासून वाट पाहणारा स्टार IN...; बांगलादेशकडून पराभवाचा दणका बसताच ऑस्ट्रेलियात खळबळ! थेट Squad मध्ये केला मोठा बदल
Global Food Crisis Warning Marathi News: 2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
2027 मध्ये जगासमोर मोठं संकट उभं राहणार; भारत, ब्राझील आणि इंडोनेशियाला अलर्ट, जेपी मॉर्गनच्या रिपोर्टमध्ये काय?
Laxman Hake and Manoj Jarange Patil: तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
तुम्ही 25 आमदार पाडले तर आम्ही 100 आमदार पाडू, मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचं प्रतिआव्हान
Mira Bhayandar Accident News: भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
भरधाव कारनं नागरिकांना उडवलं; मिरा रोडवर हिट अँड रनचा थरार! भीषण घटना डॅशकॅममध्ये कैद, घटनेनंतर कारचालक पसार
BMC BEST Depot Redevelopment: मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
मुंबई महानगरपालिकेत अत्यंत महत्त्वाचा प्रस्ताव मांडला जाणार, भाजप-शिवसेनेकडून नगरसेवकांना खास आदेश, नेमकं काय घडणार?
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Embed widget