एक्स्प्लोर
राज्यातील एसटी बसेस आता LNG वर धावणार, वर्षाला 1 हजार कोटी रुपयाचा फायदा होणार
डिझेलवर खर्च होणारा 1 हजार कोटींचा खर्च वाचणार असून अशा पद्धतीने LNG वर बस चालवणारा महाराष्ट्र देशातील पहिला असणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भक्त निवास व नवीन स्थानकाच्या भूमिपूजनाला आले असता रावते बोलत होते.
पंढरपूर : डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला उर्जित अवस्था आणण्यासाठी राज्यातील लालपरी आता LNG वर चालवण्याचा निर्णय झाला असून यामुळे महामंडळाला 1 हजार कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सांगितले. LNG हा नैसर्गिक गॅस असून यामुळे प्रदूषण देखील कमी होणार आहे.
यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास टळणार असून राज्यातील 18 हजार बसेस मध्ये किरकोळ दुरुस्त्या कराव्या लागणार आहेत, असे रावते यांनी सांगितले. एसटी यासाठी आपले पंप बाहेर बसवणार असून यातून सर्वसामान्य ग्राहकांनाही त्यांच्या गाडीत LNG टाकता येणार असल्याचे रावते यांनी सांगितले. यामुळे डिझेलवर खर्च होणारा 1 हजार कोटींचा खर्च वाचणार असून अशा पद्धतीने LNG वर बस चालवणारा महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य असणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर येथे उभारण्यात येणाऱ्या भक्त निवास व नवीन स्थानकाच्या भूमिपूजनाला आले असता रावते बोलत होते.
पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या बसेसमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून महामंडळ कर्मचाऱ्याचा पगार भागू शकतो. ही महत्वाची यात्रा असल्याने यासाठी वेगळे नियोजन केले जात असल्याचे रावते यांनी सांगितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांना आता 750 रुपयाचा पॉकेट मनी देण्याची योजना सुरु केली असून या मुलांच्या परदेशी उच्य शिक्षणाचा खर्च देखील महामंडळ उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले . महामंडळ कर्मचाऱ्याच्या मुलींसाठी 1 लाखाची ठेव योजनेतून आतापर्यंत 1 हजार कर्मचाऱ्यांना लाभ झाल्याचेही रावते यांनी सांगितले.
रायगड येथील बस मध्ये बॉम्ब सापडल्यानंतर उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक परिवहन सेवेत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले असून यापुढे असे करताना कोणी आढळल्यास कडक कारवाई केली जाणार असल्याचे रावते यांनी सांगितले. महामंडळातील भ्रष्ट टेंडर प्रक्रिया मोडून काढण्यासाठी राज्यातील सर्व बस स्टॅण्डमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे रावते यांनी सांगितले .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
रत्नागिरी
क्रीडा
मुंबई
महाराष्ट्र
Advertisement