एक्स्प्लोर
शिवशाहीचा टायर फुटला, मदत न मिळाल्याने प्रवासी रात्रभर रस्त्यावर
अंबाजोगाई आगराच्या चालत्या शिवशाही बसचं पुढचं चाक फुटलं. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता बार्शीजवळ हा प्रकार घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र एसटी प्रशासनाने वेळेत मदत न पुरवल्याने बसमधील सर्व प्रवासी बार्शीजवळ बसमध्येच अडकले.
बीड : अंबाजोगाई आगराच्या चालत्या शिवशाही बसचं पुढचं चाक फुटलं. शनिवारी मध्यरात्री 1 वाजता बार्शीजवळ हा प्रकार घडला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र एसटी प्रशासनाने वेळेत मदत न पुरवल्याने बसमधील सर्व प्रवासी बार्शीजवळ बसमध्येच अडकले.
अंबेजोगाई डेपोची अंबेजोगाई-पुणे शिवशाही या वेगातील बसचे टायर बार्शीजवळ अचानक फुटले. ही बाब चालकाच्या लक्षात आल्याने त्याने प्रसंगावधान राखून हेलकावे खाणाऱ्या गाडीवर नियंत्रण मिळवून गाडी थांबवली आणि संभाव्य अनर्थ टळला. यावेळी गाडीत बालक, महिलांसह 40 प्रवाशी होते. चालकाने नंतर बार्शी आगारात संपर्क साधून मदत पाठविण्याची विनंती केली, परंतु, बार्शी आगराकडून कसलाही प्रतिसाद मिळाला नाही.
प्रवाशांनी अख्खी रात्र रस्त्यावर काढली. तर काहीजण कंटाळून मिळेल ते वाहन पकडून निघून गेले. अनेक विनंत्या केल्यानंतर बार्शी आगारातून सकाळी एक मेकॅनिक आला, परंतु त्यालाही टायर काढता आले नाही. या कामासाठी आणखी मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगूनही बार्शी आगाराकडून वेळेवर मदत मिळाली नाही. मागील आठवड्यात याच बसचे टायर अचानक पेटले होते अशी माहितीही आता समोर आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे शिवशाही बसच्या सुरक्षेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ज्या डेपोची ही बस होती, त्या अंबेजोगाई डेपोकडून ड्रायव्हरला सांगण्यात आलं, की शिवशाही बस हवी असेल तर अंबेजोगाई डेपोत येऊन घेऊन जा. त्यामुळे एसटीच्या प्रवासातील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
दरम्यान, मोठ्या थाटात सुरु झालेल्या आरामदायी शिवशाही बस नियोजनाअभावी प्रवाशांसाठी गैरसोयीच्या ठरत आहेत. या सर्व बसेस भाडेतत्वावर घेण्यात आल्या आहेत. त्यात चालक ठेकेदाराचा, तर वाहक महामंडळाचा अशी जोडी लावण्यात आली आहे. त्यामुळे अडचणीच्या वेळी बस आगारातील कर्मचारी खाजगी चालकांना मदत करण्यास टाळाटाळ करतात. परिणामी वेळेवर मदत मिळत नसल्याचा त्रास आरामदायी प्रवासाच्या इच्छेखातर दीडपट पैसे मोजून प्रवास करणाऱ्यांना होत आहे. प्रवाशांकडूनही या बसची विशेष काळजी घेतली जात नसल्याचेही चित्र आहे. अनेक गाड्यात प्रवाशांनी थुंकून घाण केली आहे, तर अनेक गाड्यातील एसी व्हेन्ट, सॉकेट तोडलेले आहेत.
मागच्याच आठवड्यातच केज तालुक्यातील होळजवळ शिवशाही बसला अपघात होऊन एका शिक्षिकेला आपला जीव गमावावा लागला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement