लालपरी पुन्हा नव्या दमाने धावणार; कर्मचारी परतले, प्रवाशांमध्ये आनंदाचे वातारण
ST Employees Back To Work: गेले साडेपाच महिने ठप्प असलेली गावोगावची एसटी वाहतूक अखेर सुरू होतेय. न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत 70 हजार कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झालेत.
ST Employees Back To Work: गेले साडेपाच महिने ठप्प असलेली गावोगावची एसटी वाहतूक अखेर सुरू होतेय. न्यायालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत 70 हजार कर्मचारी पुन्हा कामावर रूजू झालेत. उच्च न्यायालयानं 22 एप्रिलपर्यंत कामावर हजर होण्याचे आदेश संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना दिले होते. पुढच्या दोन दिवसांत उर्वरित कर्मचारी कामावर रूजू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शुक्रवारपासून लालपरी गावखेड्यात पुन्हा पूर्ण क्षमतेनं धावणार आहे. नोव्हेंबर महिन्यापासून एसटी कामगारांनी संप पुकारल्यानं राज्याची जीवनवाहिनी ठप्प झाली होती. दुर्गम भागात राहणारे नागरिक, विद्यार्थी यांना या संपाचा मोठा फटका बसला होता. आता एसटी पुन्हा सुरु झाल्यानं त्यांना दिलासा मिळाला आहे.
एसटी बंद असल्याने अनेक नागरिक आणि विद्यार्थ्यांचे हाल होत होते. एसटीला पर्याय म्हणून अनेक प्रवासी वडाप किंवा इतर पर्यायी वाहनांचा वापर करत होते. यामुळे अनेक वेळा नागरिकांना जाडा पैसे ही मोजावेत लागत होते. आता पुन्हा एसटी आपल्या पूर्ण क्षमतेने सुरु झाल्याने प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तसेच यामुळे विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे.
न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचारी कामावर परतले
मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी कर्मचाऱ्यांना आदेश दिल्यानंतर मंगळवारी 7,435 कर्मचारी कामावर हजर झाले होते. आता कामावर रुजू झालेल्या कमर्चाऱ्यांची संख्या 69,082 इतकी झाली आहे. यामध्ये सुमारे 24 हजार ड्रायव्हर तर 19,500 कंडक्टर यांचा समावेश आहे. सोमवारी एसटी महामंडळाने राज्यभरात 23 हजार 760 फेऱ्या चालवीत प्रवाशांना सेवा दिली. न्यायालयाच्या आदेशानंतर 26 हजार कर्मचारी नव्याने कामावर हजर झाले असल्याची माहिती आहे.
एसटी महामंडळातील आज हजर झालेले कर्मचारी
- 20 एप्रिल रोजी 4888 कर्मचारी रूजू झाले.
- 20 एप्रिल रोजी एकूण उपस्थित कर्मचारी 73970
इतर महत्त्वाच्या बातम्या: