एक्स्प्लोर
दहावीचा निकाल पुढच्या आठवड्यात!
पुणे : बारावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीचा निकाल पुढील आठवड्यात लागणार असल्याचं महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, त्यावर आता पडदा पडला आहे.
पुढच्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर दहावीच्या निकालाच्या वेगवेगळ्या तारखा पसरवल्या जात आहेत. मात्र, सोशल मीडियावर फिरणाऱ्या तारखा अफवा आहेत.
सोशल मीडियावर फिरणाऱ्या दहावीच्या निकालाच्या तारखांमुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी स्पष्ट केल्याने गोंधळ दूर झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
महाराष्ट्र
जळगाव
राजकारण
Advertisement