एक्स्प्लोर

दोन वर्षे जेलमध्ये राहूनही डिप्रेशनमध्ये गेलो नाही, मग तुम्हाला डिप्रेशन कसं येतं? छगन भुजबळांचा विद्यार्थ्यांना सवाल

SSC Result 2022 : दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग  तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन कसं येतं? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते  छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी विद्यार्थ्यांना विचारला आहे.  

SSC Result 2022 :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC 10th Result 2022) आज जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी राज्याचा दहावीचा निकाल 96.94 टक्के लागला आहे. तर 3.06 टक्के विद्यार्थी या परीक्षेत नापास झाले आहेत. परंतु, नापास झाल्यानंतर विद्यार्थींनी निराश होऊ नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला आहे. "दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही आणि तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येतं का? असा प्रश्न  विचारत डिप्रेशन न घेता अभ्यास करण्याचा सल्ला छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. 

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेले पुणे विद्यापीठाचे उपकेंद्र लवकरच नाशिकमध्ये उभारले जाणार आहे. आज त्याचा भूमिपूजन सोहळा दिंडोरी तालुक्यातील शिवनई गावात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी विद्यार्थी आणि विद्यापिठाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज लागलेल्या निकालाचा धागा पकडत छगन भुजबळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी जेलमधील अनुभव  विद्यार्थ्यांना सांगितला. दोन वर्षे मी जेलमध्ये राहून आलो तरी डिप्रेशनमध्ये गेलो नाही. मग  तुम्हाला ऑनलाईन शिक्षणामुळे डिप्रेशन येत का? डिप्रेशन न घेता विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा, असे  छगन भुजबळ यावेळी म्हणाले. 

छगन भुजबळ म्हणाले, "24 जून 2013 ला उपकेंद्राबाबत निर्णय घेण्यात आला होता. पण नंतर दुसरे सरकार आल्याने ते काम थांबले होते. मात्र,  आता आमचे सरकार परत आल्याने हे काम पूर्णत्वास जात आहे."

छगन भुजबळ यांनी यावेळी भाजपवर देखील निशाणा साधला. देशात आज वाईट परिस्थिती आहे. पण ताई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहेत. जाऊद्या आता मी काही बोललो तर ताईंची अडचण होईल असा टोलाही त्यांनी भारती पवार यांना लगावला आले. 

"मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना मुमं, छगन भुजबळांना अन्नपू मंत्री आणि उदय सामंत यांना उशीतशी असे शॉर्ट कटमध्ये म्हणतात असं म्हणतात, असा विनोद देखील छगन भुजबळ यांनी यावेळी केला. केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनीही यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget