एक्स्प्लोर
दहावीचा राज्याचा निकाल 77.10 टक्के; कोकण विभाग अव्वल
यंदाचा दहावीचा राज्याचा निकाल 77.10 टक्के इतका लागला आहे. दहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमानंतर घेतलेली ही पहिलीच परिक्षा होती. त्यामुळे निकाल घसरल्याचे बोलले जात आहे.
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदा दहावीचा निकाल 77.10 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदा 12.31 टक्क्यांनी निकाल कमी लागला आहे. मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे ही प्रेस कॉन्फरन्स यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
दरम्यान विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजल्यापासून बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर त्यांचा निकाल पाहता येईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना आपण संपादित केलेल्या गुणांच्या माहितीची प्रिंटआऊट काढता येईल. गुणपडताळणी आणि छायांकित प्रतीसाठी अर्ज करण्याची सुविधा दुसऱ्या दिवसापासून उपलब्ध होणार आहे.
गेल्या पाच वर्षांमधील यंदा दहावीचा सगळ्यात कमी निकाल लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार हे पहिलंच वर्ष होतं. त्यामुळे कमी निकाल लागू शकतो, असं शकुंतला काळे म्हणाल्या. याआधी 2007 मध्ये 78 टक्के निकाल लागला होता. त्यानंतर यावर्षी एवढा कमी निकाल लागला आहे.
कोकण अव्वल, नागपूर तळाला
मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे दहावी परीक्षा घेण्यात आली होती. यात कोकण विभागाचा सर्वाधिक 88.38 टक्के निकाल लागला आहे. तर 67.27 टक्क्यांसह नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी आहे.
यंदाही मुलींची बाजी
निकालाच्या बाबतीत यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. यावर्षी विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी 10.64 टक्क्यांनी जास्त आहे. तर दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के लागला आहे.
20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
संपूर्ण राज्यात यंदा 16 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सुमारे 12 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यात यंदा एकूण 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. लातूर विभागात सर्वाधिक 16, औरंगाबाद विभागात 3 आणि अमरावती विभागात एका विद्यार्थ्याला 100 टक्के गुण मिळाले आहेत. हे 100 टक्के गुण बेस्ट ऑफ 5 चे मिळून आहेत. तर 25,941 विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांच्या वर गुण आहेत.
दहावीचा विभागनिहाय निकाल
पुणे - 82.48 टक्के
मुंबई - 77.04 टक्के
नागपूर - 67.27 टक्के
अमरावती - 71.98 टक्के
लातूर - 72.87 टक्के
नाशिक - 77.58 टक्के
औरंगाबाद - 75.20 टक्के
कोल्हापूर - 86.58 टक्के
कोकण - 88.38 टक्के
दहावी निकालाची वैशिष्ट्ये
* यंदा 12.31 टक्क्यांनी कमी निकाल
* कोकण अव्वल (88.38 टक्के), नागपूर तळाला (67.27 टक्के)
* मुलींची बाजी (यंदा 10.64 टक्के जास्त निकाल)
* 20 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण
* दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 83.05 टक्के
2006 ते 2019 पर्यंतच्या निकालाची टक्केवारी
2006 - 72.72 टक्के
2007 - 78.67 टक्के
2008 - 87.41 टक्के (20 गुणांची तोंडी परीक्षा या वर्षापासून सुरु झाली)
2009 - 84.21 टक्के
2010 - 83.62 टक्के
2011 - 76.06 टक्के
2012 - 81.32 टक्के
2013 - 83.48 टक्के
2014 - 88.32 टक्के
2015 - 91.46 टक्के
2016 - 89.56 टक्के
2017 - 88.74 टक्के
2018 - 89.41 टक्के
2019 - 77.10 टक्के
याठिकाणी पाहता येणार निकाल
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharshtraeducation.com
कसा पाहाल निकाल?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव अश्विनी आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये ASH असं लिहावं लागेल.
दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल. त्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शाळेतून विद्यार्थी गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र घेऊ शकतात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement