Nitesh Rane On The Kashmir Files : विवेक अग्निहोत्रीचा 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अनेक राज्यांत हा सिनेमा करमुक्त करण्यात आला आहे. महाराष्ट्रातही हा सिनेमा करमुक्त व्हावा, अशी मागणी होत असताना आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी कणकवली मतदारसंघात 'द कश्मीर फाइल्स'चे खास शो आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे. 


नितेश राणे यांनी याआधीदेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून 'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा महाराष्ट्र राज्यातही करमुक्त करण्याची विनंती केली आहे. आता कणकवली मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाने हा सिनेमा पाहवा यासाठी नितेश राणेंनी या सिनेमाचे खास शो आयोजित करणार असल्याची घोषणा केली आहे.





'द काश्मीर फाइल्स' हा सिनेमा आतापर्यंत देशातील 7 राज्यांनी करमुक्त केला आहे. या राज्यांत मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, गुजरात, गोवा, त्रिपुरा आणि कर्नाटक या राज्यांचा समावेश आहे. काश्मीरमधील काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचारावर हा सिनेमा भाष्य करणारा आहे.





 'द कश्मीर फाईल्स' सिनेमात मिथुन चक्रवर्ती, पल्लवी जोशी, अनुपम खेर आणि दर्शन कुमार अशी तगडी स्टारकास्ट आहे. हा सिनेमा भूतकाळ आणि वर्तमान दोन्हीवर भाष्य करणारा आहे. सोशल मीडियावरही सध्या हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे.


संबंधित बातम्या 


RRR Sholay Viral : 'बाहुबली'च्या राजामौलीने 'साऊथ'मध्ये करुन दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर काटा आणणारी फ्रेम


The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून 'द कश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय? मग तुमचेही बँक खाते रिकामं होऊ शकतं, तिघांना 30 लाखांचा फटका


The Kashmir Files : केंद्र सरकारने 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा : अजित पवार


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha