RRR Sholay Viral : बाहुबली फेम एसएस राजामौलींच्या बहुप्रतिक्षित 'आरआरआर' (RRR) सिनेमाची प्रेक्षक प्रतीक्षा करत आहेत. हा सिनेमा 25 मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतेच या सिनेमातील शोले (Sholay) हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून सोशल मीडियावर हे गाणं चांगलच व्हायरल होत आहे. 


'आरआरआर' सिनेमातील 'शोले' या गाण्यात भारतातील थोर पुरुषांची झलक दाखवण्यात आली आहे. तसेच सिनेमात दाखवण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची अंगावर शहारे आणणारी फ्रेम सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. देशाच्या इतिहासातील महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांना मानवंदना देण्याचा प्रयत्न सिनेमात करण्यात आला आहे. सध्या देशभर या गाण्याची चर्चा आहे.





दोन क्रांतीकारकाची यशोगाथा 'आरआरआर' या सिनेमात मांडण्यात आली आहे. रामचरण (Ram Charan), ज्युनियर एनटीआर (Jr NTR) आणि आलिया भट्ट  (Alia Bhatt) या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात रामचरणने स्वातंत्र्यसैनिक अल्लुरी सीताराम राजू ची भूमिका साकारली आहे. तर ज्युनियर एनटीआर 'कोमाराम भीम'च्या भूमिकेत दिसणार आहे. हा सिनेमा तामिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.


 


संबंधित बातम्या


The Kashmir Files : व्हॉट्सअप लिंकवरून 'द कश्मीर फाइल्स' डाऊनलोड करताय? मग तुमचेही बँक खाते रिकामं होऊ शकतं, तिघांना 30 लाखांचा फटका


Shah Rukh Khan : किंग खानचे चाहते नाराज, शाहरुख नवा ओटीटी प्लॅटफॉर्म लॉंच करणार नाही


The Kashmir Files : शूटिंगमध्ये चिन्मय मांडलेकरला द्याव्या लागल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणा! पाहा नेमकं काय झालं...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha