The Kashmir Files : सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवरील लिंकवर क्लिक करून सायबर फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 'द काश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या नवीन चित्रपटाची लिंक डाउनलोड करण्याच्या बहाण्याने स्कॅमर असे मालवेअर व्हॉट्सअॅपवर पाठवू शकतात, जे तुमचे बँक खाते हॅक करू शकतात आणि तुमचे पैसे पळवू शकतात.


याबाबत नोएडा पोलिस अधिकाऱ्याने मंगळवारी लोकांना सोशल मीडिया आणि व्हॉट्सअॅपवर अज्ञात लोकांकडून पाठवलेल्या संशयास्पद लिंकवर क्लिक करण्यापासून सावध केले. अधिकाऱ्याने सांगितले की,"सायबर गुन्हेगार ऑनलाइन पेमेंट करण्याच्या बहाण्याने किंवा लोकप्रिय चित्रपट किंवा व्हिडिओमध्ये विनामूल्य प्रवेशासाठी लिंक सामायिक करण्याच्या बहाण्याने अशा लिंक पाठवू शकतात, जेणेकरून वापरकर्त्यांचे फोन हॅक केले जाऊ शकतात आणि त्यांच्या मोबाइल नंबरशी लिंक केलेली बँक खाती रिकामी केली जाऊ शकतात". 


चित्रपटाच्या लिंकवर क्लिक केल्यास फसवणूक 
अतिरिक्त उपायुक्त (नोएडा) रणविजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'द कश्मीर फाइल्स' या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची लिंक शेअर करण्याच्या बहाण्याने सायबर फ्रॉड व्हॉट्सअॅपवर असे मालवेअर पाठवू शकतात, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.


सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की,चित्रपटाचे नाव वापरण्यात आले आहे असे कोणतेही विशिष्ट प्रकरण नाही, परंतु लोकांचे फोन हॅक करण्यासाठी किंवा पैशांची फसवणूक करण्यासाठी अशा पद्धतीचा वापर केला जाऊ शकतो. व्हॉट्सअ‍ॅपवर लोकांसोबत लिंक शेअर केल्याची अनेक प्रकरणे घडली आहेत, जिथे फोन वापरकर्त्यांनी काही क्लिक केल्यानंतर त्यांच्या बँक खात्यातील बचत गमावली.


तिघांचे 30 लाखांचे नुकसान 


अधिकाऱ्याने सांगितले की, अलीकडेच 24 तासांत एकाच पोलिस ठाण्यात तीन जणांच्या सायबर फसवणुकीच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामध्ये त्यांचे 30 लाखांचे नुकसान झाले आहे. कोणतीही ऑनलाइन फसवणूक झाल्यास त्यांनी लोकांना सायबर हेल्पलाइन 1930 किंवा 155260) वर त्वरित कॉल करण्यास सांगितले.


संबंधित बातम्या


The Kashmir Files : केंद्र सरकारने 'द कश्मीर फाइल्स' करमुक्त करावा : अजित पवार


The Kashmir Files Box Office Collection Day 5 : बिग बजेट चित्रपटांना मागे टाकत काश्मीर फाईल्सची बॉक्स ऑफिसवर जादू कायम;  पाचव्या दिवसाची कमाई माहितीये?


The Kashmir Files : 'द काश्मीर फाईल्स' चित्रपटाबद्दल रितेशनं शेअर केली पोस्ट; म्हणाला...


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha