Sangli District Bank News :  कुणाचंही व्याज माफ करण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतलेला नाही आणि तसा कुठलाही विषय आज संचालक मंडळासमोर आलेला नाही, असे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. 50 कोटींचं कर्ज मागील 25 ते 30 वर्षांचे त्याची कागदपत्र व्यवस्थित मिळत नाहीत, त्याचा वसुलीचा हक्क ठेवून तो write off करण्याचा निर्णय घेतला आहे, असेही नाईक म्हणाले. 


वन टाइम सेटलमेंन्टची योजना आधी मोठ्या कंपन्या, कर्जदारांना होती. शेतकऱ्यांना देखील वन टाइम सेटलमेंट योजनेत सामीलकरणार आहोत. यासंदर्भात १९ तारखेला बैठक आहे. बड्या नेत्यांचीच कर्ज आहे असं नाही, यात काही ट्रान्सपोर्ट कंपन्या आहेत, त्याचा मालक घावत नाही. त्याची एका रुपयाची देखीलइस्टेट नाही. कोणी बडा नेता किंवा राजकीय व्यक्ती बघून हे केलं नाही, असे मानसिंगराव नाईक म्हणाले. 


त्यावेळेसचे संचालक वेगळे होते, अधिकारी वेगळे होते. संचालक मंडळासमोर येत ती कर्ज दिली गेली आणि त्याचा एक रुपया देखीलवसूल नाही. बॅंकेला एनपीए कमी असलं तर इतर सोईसुविधा मिळतात. त्यामुळे बॅंकेच्या अंतर्गत कामकाजासाठी घेतलेला तो निर्णय आहे. जयवंत कडू यांना दोन महिन्याच्या कालावधीसाठी घेतलं होतं. ३१ डिसेंबरला त्यांची मुदत संपली होती. संचालक मंडळांनी तीनमहिन्यांची मुदतवाढ त्यांना दिली होती. ३१ मार्चला मुदत संपत असल्यानं नवीन एमडी आणण्याची प्रक्रिया सुरु केलीय. त्यामुळे त्यांचा तडकाफडकी राजीनामा घेतला असं काही नाही, असे मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. संचालक मंडळानं नियमाप्रमाणे कर्जांबाबत निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मंजुरीनंतर नाबार्डला याविषयी कळवणार आहे, असेही नाईक म्हणाले. 


सीईओच्या राजीनाम्यामुळे अनेक तर्क-वितर्क


‘सीईओ’ कडू-पाटील यांनी राजीनामा दिल्याने तर्क-वितर्क लढविले जात आहेत. नवीन सीईओंची नियुक्ती होईपर्यंत कडू-पाटील यांना कामाचे आदेश दिले होते. मात्र, बड्या कर्जदारांची वन टाईम सेटलमेंट, राईट ऑफ यावरून संचालक मंडळात वादंग सुरू आहेत. जिल्ह्याच्या बँकिंग वर्तुळातही याची मोठी चर्चा सुरू असताना सीईओ कडू-पाटील यांनी आज राजीनामा दिला. बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक हे विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे मुंबईत आहेत. येत्या दोन दिवसांत सांगलीत येतील. त्यांच्याशी चर्चा करून  कडू-पाटील पदभार सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 


ही कर्ज प्रकरणे बुडीत खात्याला जाण्याची शक्यता


       कर्जदार                           रक्कम


डफळे  कारखाना,जत           1 कोटी 50 लाख


महाकंटेंनर्स, कुपवाड            2 कोटी 58 लाख


निनाईदेवी ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था     5 कोटी 95 लेख
   
प्रकाश ऍग्रो                        4 कोटी 98 लाख


वसंत बझार                         1 कोटी 30लाख


नेरला सोसायटी,         1 कोटी 34 लाख


यशवंत ऊस उत्पादक तोडणी वाहतूक संस्था    3 कोटी 33 लाख


महाराष्ट्र विद्युत उत्पादक      6 कोटी 57लाख


शिवशक्ती ग्लुकोज, लेंगरे     91 लाख


निनाईदेवी कारखाना           26 कोटी 81 लाख


माणगंगा तोडणी वाहतूक संस्था 1 कोटी 77 लाख
 
वसंतदादा सूतगिरणी        1 कोटी 53 लाख


माधवनगर कॉटन मिल     2 कोटी 38 लाख


वसंतदादा शाबू प्रकल्प      1 कोटी 71लाख


लक्ष्मी यंत्रमाग, हिंगणगाव   1कोटी 24 लाख


अग्रणी यंत्रमाग, कवठे महाकाळ  90लाख


जयसिंग यंत्रमाग, कवठे महाकाळ  1 कोटी 1 लाख


सुयोग यंत्रमाग , कवठे महाकाळ    1 कोटी 2 लाख