एक्स्प्लोर
किल्ले उभे राहत नाहीत, तोपर्यंत दिवाळीचा फील नाही !
कोल्हापूर: दिवाळी म्हटलं की किल्ले आलेच, लहानग्यांसोबत मोठेही किल्ले बनवण्यास हातभार लावत असतात. दिवाळीच्या सुट्टीत छोट्या मावळ्यांची ही धम्माल सुरु असते.
चार टाळकी गोळा झाली... माती उकरली... त्याचा काला केला... की जणू पोरांमध्ये मावळाच संचारतो. कोल्हापूरमधल्या पोरांसमोर एकच लक्ष्य आहे... आपला किल्ला सगळ्यात भारी दिसला पाहिजे.
कुठे प्रतापगड... कुठे सिंहगड... कुठे तोरणा... कुठे रांगणा... प्रत्येक गडाचा आकार वेगळा... प्रत्येकाची वैशिष्ट्य वेगळी.
किल्ला जितका मोठा... तितका त्याला डिमांड... म्हणूनच गल्ल्यातला प्रत्येक जण झटतोय.
सांगलीच्या बाजारात अशा रेडीमेड किल्ल्यांचे स्टॉल लागले आहेत... पण जोपर्यंत अंगाला माती लागून त्यात पोरं बरबटत नाहीत... तोवर दिवाळी सुरु झाल्याची फीलच येत नाही...
शिवरायांचं स्मारक नव्या सरकारनं मार्गी लावलं आहे... पण तितकीच महत्त्वाची आहेत... अशी छोटी छोटी प्रेरणादायी स्मारकं... जी स्फूर्ती देतील महाराष्ट्रातल्या बालमावळ्यांना
कुलदीप माने, रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर
VIDEO:
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement