Majha Katta : न्यायाधीशांवर दडपण असतं का? कोणत्या प्रकरणात अधिक कस लागतो? न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी म्हणतात...
Satyaranjan Dharmadhikari : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे नुकतेच माझा कट्टा या कार्यक्रमात आले होते. यावेळी त्यांनी मनसोक्त गप्पा मारत भारतातील न्यायव्यवस्थेतील अनेक बाबी उलगडल्या.
Satyaranjan Dharmadhikari on Majha Katta : मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी (Satyaranjan Dharmadhikari) हे नुकतेच एबीपी माझाच्या कट्ट्यावर(Majha Katta) आले होते. जेष्ठ न्यायमूर्ती आणि गांधीवादी चंद्रशेखर धर्माधिकांरी यांचे ते सुपुत्र, वकिली त्यांच्या रक्तातच असल्याने त्यांना या सर्व न्यायव्यवस्थेबद्दल सर्व माहिती आहे. धर्माधिकारी घराण्याचा न्यायदानाचा वारसा पुढे नेणारी सत्यरंजन यांची तिसरी पिढी आहे. अशामध्ये एक न्यायाधीश म्हणून काम करताना खासगी जीवनात दडपण येतं का? कोणत्या प्रकारच्या प्रकरणांत अधिक कस लागतो, अशा प्रश्नांची उत्तरं सत्यरंजन यांनी यावेळी दिली.
सत्यरंजन यांची कारकीर्द प्रचंड मोठी आहे. राज्याच्या समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणाशी निगडित अत्यंत हाय प्रोफाइल खटले त्यांनी हाताळले. दाभोलकर, पानसरे हत्या प्रकरण, आरे कारशेडचा वाद, पीएनबी घोटाळा, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा, निवडणुकीशी संबधित अनेक प्रकरणांची सुनावणी न्यायमूर्ती म्हणून त्यांनी हाताळली आहे. पण हे सारं असतानाही त्यांना अधिक कस हा करविषयक प्रकरणांमध्ये लागतो असं ते म्हणाले. प्रसिद्धी पावलेल्या प्रकरणात नाही, तर दररोजच्या प्रकरणात कस दिसून आला. करविषयक प्रकरणात अधिक मन लागलं, त्या प्रकरणातून खूप शिकायला मिळालं. असंही सत्यरंजन म्हणाले.
न्यायमूर्ती म्हणून दडपण येतं का?
एक न्यायमूर्ती म्हणून काम करताना तसंच त्यामुळे खासगी जीवनात दडपण येतं का? असा प्रश्न सत्यरंजन यांना विचारला असता ते म्हणाले,''माझ्यावर कधी दडपण नव्हतं. पण आयुष्य संयमाने आणि शिस्तीने जगलो. हा माझ्या स्वभावातीलच गुण असावा. माझ्या मित्र परिवाराने देखील सर्व सीमा पाळल्या.तसंच तुमचे कोणतेही कार्यक्रम, परदेशवारी या सर्वाबाबत केंद्र सरकारला, मुख्य न्यायाधिशांना सांगण्यात चुकीचं काय? शिस्त असणं चांगलचं आहे.''
पाहा संपूर्ण कट्टा...
हे देखील वाचा-