एक्स्प्लोर

Monsoon 2020 | मान्सूनचा वेग वाढला; येत्या काही दिवसात मुंबई, कोकणसह महाराष्ट्रात पावसाची वर्दी

अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता मिळणार आहे.

मुंबई : भारतीय उपखंडात मान्सून सामान्य गतीने पुढे सरकत आहे. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याने येत्या काही दिवसात मुंबईसह कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही लवकरच मान्सूनच्या आगमनाची शुभ वार्ता मिळणार आहे. शिवाय आता कृषी क्षेत्रासाठीही मान्सूनकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत.

येत्या काही दिवसात मान्सून पुढे सरकण्यासोबतच ओडिशा, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रात 10 ते 16 जून दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, कर्नाटक आणि केरळच्या समुद्रकिनारी दाखल झाल्यानंतर मान्सूनने मागील दोन दिवसात कर्नाटकचा अंतर्गत भाग, तामिळनाडूचा बहुतांश भाग आणि रायलसीम तसंच आंध्र प्रदेशच्या दक्षिण किनारपट्टीच्या काही भागांमध्ये वर्दी दिली आहे.

बंगालची खाडी सक्रिय बंगालच्या खाडीत लवकरच एक निम्न दबावाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यात आहे. सध्या बंगालच्या खाडीचं मध्य-पूर्व आणि त्याजवळच असलेल्या बांगलादेश तसंच म्यानमारच्या किनारपट्टी भागांमध्ये चक्रीवादळाच्या वाऱ्याचं क्षेत्र निर्माण झालं आहे. वातावरणाची परिस्थिती आणि सागरी परिस्थितीमुळे असे संकेत मिळत आहेत की, लवकरच या क्षेत्राचं रुपांतर निम्न दबावच्या क्षेत्रात होईल. अशीच परिस्थिती राहिली तर देशाच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडू शकतो.

राज्यात लवकरच मान्सूनची शुभ वार्ता बंगालच्या खाडीत निर्माण होणाऱ्या स्थितीमुळे मान्सून मोठी झेप घेण्याची शक्यता आहे. जेणेकरुन मान्सून पूर्वोत्तर भाग पार करुन पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि ओदिशामध्ये पोहोचेल. तसंच अरबी सागरात नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे येत्या काही दिवसात मान्सून कर्नाटक आणि रायलसीमाचा भाग पार करुन तेलंगणाला पोहोचेल. सोबतच मुंबईसह कोकण आणि आणि मध्य महाराष्ट्रातही लवरकर मान्सून वर्दी देईल.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सामान्यपेक्षा 71% जास्त पाऊस पूर्वोत्तर भारतात मान्सूनचा वेग काहीसा धीमा आहे. परंतु 3 ते 4 दिवस उशीर हे सामान्यच समजलं जातं. याचदरम्यान पूर्वोत्तर भारताच्या काही भागांसह कोकण, महाराष्ट्र, तेलंगणा तसंच आंध्र प्रदेशच्या उर्वरित भागांमध्ये मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थितीत निर्माण झाली आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा 71% अधिक पडला आहे. यात सर्वाधिक योगदान मध्य भारत आणि केरळचं आहे.

माहिती स्रोत : skymetweather.com 

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता
Maharashtra Live blog updates: नाशिक जिल्ह्यात पुन्हा सौम्य भूकंपाचे धक्के; नागरिकांमध्ये चिंता

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Sanjay Raut : इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
इकडल्या बंगल्यातून दिल्लीच्या बंगल्यात जायचंय, मोठा बंगला मिळेल, वहिनीसाहेबांनी मानसिकता करावी, संजय राऊतांचा खोचक टोला
Embed widget