एक्स्प्लोर

आईला कोरोनाची लागण झाल्याने मुलाने संपविले जीवन; नाशिकमधील घटना

आत्महत्येपूर्वी त्याने कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. आत्महत्येला केवळ आईला झालेली कोरोनाची लागण ही एकमेव कारण आहे की इतर काही कारण आहे याचा शोध उपनगर पोलिस घेत आहेत.

नाशिक : कोरोनाचा क्रूर चेहरा आता समोर येऊ लागला आहे, आईला कोरोनाची लागण झाल्याने मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या रोकडोबावाडी परिसरात घडली असून संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रोकडोबावडी वसाहत आहे. येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. काही दिवसांपूर्वी त्यांना नाशिक महापालिकेन उभरेलल्या समाज कल्याण हॉस्टेलच्या जागेतील कोव्हिड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. तब्येतीची विचारपूस करण्यासाठी दोन दिवसपूर्वी महिलेचा 23 वर्षीय मुलगा कोव्हिड सेंटरमध्ये गेला होता. त्यानंतर घरी आला आणि त्याने घरात गळफस घेऊन आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्क बसला. त्याच्या बहिणींच्या निदर्शनास ही घटना आल्यानंतर पोलिसांना पाचरण करण्यात आला उपनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी करत पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे.

आत्महत्येपूर्वी त्याने कुठलीही चिठ्ठी लिहिलेली नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. आत्महत्येला केवळ आईला झालेली कोरोनाची लागण ही एकमेव कारण आहे की इतरही काही कारण आहे याचा शोध उपनगर पोलिस घेत आहेत. रोकडोबावडी हा स्लम परिसर आहे. त्यामुळे कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? मुलगा काय नोकरी व्यवसाय करत होता. त्याचे कौटुंबिक आयुष्य कसे होते, आत्महत्येपूर्वी तो कोणाशी फोनवर अथवा प्रत्यक्ष काही बोलला होता का त्याची मानसिक स्थिती कशी होती अशा सर्व प्रशांनाची उकल करण्याचा प्रयत्न नाशिक पोलिसाकडून केला जात असल्याची माहिती उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील रोहकले यांनी एबीपी माझाला दिली.

नाशिक शहरातील आत्महत्येची ही घटना असली तरी कोरोनाच्या काळात आत्महत्या झालेली जिल्ह्यातील ही तिसरी घटना आहे. एप्रिल महिन्यात चेहडी परिसरात राहणाऱ्या 31 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. कोरोना झाल्याच्या संशयातून त्याने आत्महत्या केली होती. आपल्याला कोरोना झालाय या शंकेने त्याच्या मनात घर केलं होत आणि इंजेक्शनची भीती वाटत असल्यान या भीतीपोटी त्याने आत्महयत्या केली होती. त्यानंतर जून महिन्यात सिन्नर तालुक्यातील भोकणी या गावात एका वृद्धानं थेट कॉरंटाईन सेंटरमध्येच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे गावाचे वैद्य महून ही जाखू मेंगाळ ही परिचित होते ते कावीळसह इतर आजारावर घरगुती उपचार करायचे मात्र त्यानाही कोरोना झाल्याची भीती वाटली आणि त्यातच त्यांनी जीवनयात्रा संपविली. कोरोना संदर्भात जनमानसात प्रचंड भीती आहे. कोरोना झाला तर आपलं काही खरे नाही अशी भावना नागरिकांची झाली आहे. त्यातच एकत्र रुग्णांना हॉस्पिटल उपलब्ध होत नाही. हॉस्पिटल मिळाले तर लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची ओरड आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करून त्यांचे मनोबल वाढविण्याची गरज आहे.

संबंधित बातम्या :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी
इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी
Accident News : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
Weather Update: रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
Boeing vs Airbus Difference: Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Imtiaz Jalil PC : पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात तक्रार दाखल केली, मी हायकोर्टात जाणारSupriya Sule Speech : माझी इच्छा बिनविरोध निवडणुकीची होती, पण... सुप्रिया सुळे UNCUTNashik Dwarka Traffic : नाशिकच्या द्वारका सर्कल येथे मोठी वाहतूक कोंडींची समस्याMumbra Local Accident : मुंब्रा रेल्वे अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शी रोहित गोविंदे यांनी काय माहिती दिली? कसा घडला अपघात?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी
इराण आणि इस्त्रायलमद्ये गेल्या 48 तासांपासून घनघोर संघर्ष सुरुच; तेल प्रकल्पांवर हल्ल्यानंतर इराणने इस्रायलवर प्रगत मिसाईल डागली, अनेक जीवितहानी
Accident News : कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
कोल्हार-घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स अन् ट्रकची जोरदार धडक, तिघांचा मृत्यू
Weather Update: रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
रत्नागिरीत रेड अलर्ट, जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी; साताऱ्यातही धुवाँधार, रायगडला सुद्धा कोसळधारा
Boeing vs Airbus Difference: Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Air India च्या विमान अपघातानंतर Boeing अन् Airbus चर्चेत, दोघांमधील फरक काय?
Solapur News:  पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
पुण्यातील सराईत गुंडाचा सोलापुरात खात्मा; पुणे पोलिसात अनेक गुन्हे दाखल, गुन्हे शाखेची कारवाई
Naxal Encounter : बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
बालाघाटमध्ये पोलीस अन् नक्षलवाद्यांमध्ये चकमक; चार नक्षलवादी ठार, तीन महिलांचा समावेश
अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू,डीएनएद्वारे 19 मृतदेहांची ओळख पटली, जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
अहमदाबाद विमान अपघातात 270 जणांचा मृत्यू, डीएनएद्वारे 19 मृतदेहांची ओळख पटली, जाणून घ्या आतापर्यंत नेमकं काय-काय झालं?
Dubai Skyscraper Fire : दुबईत तब्बल 67 मजली स्कायस्क्रॅपर इमारतीला आगीचा वेढा, 4 हजार लोक अडकले अन् एकही जिवितहानी होऊ न देता सर्वांची थरारक सुटका
दुबईत तब्बल 67 मजली स्कायस्क्रॅपर इमारतीला आगीचा वेढा, 4 हजार लोक अडकले अन् एकही जिवितहानी होऊ न देता सर्वांची थरारक सुटका
Embed widget