धक्कादायक! वृद्ध भाविकावर टोळक्याचा प्राणघातक हल्ला, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराजवळ घडली घटना
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपुरातील सर्वात जास्त सुरक्षा असणाऱ्या या भागात आज पहाटे वृद्ध भाविकांवर टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
Solapur Crime news : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपुरातील सर्वात जास्त सुरक्षा असणाऱ्या या भागात आज पहाटे वृद्ध भाविकांवर टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.
किरकोळ कारणावरुन वृद्ध भाविकाला टोळक्याकडून मारहाण
बारा महिने इथे हजारो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. मात्र आज पहाटे पुणे येथील काही वृद्ध भाविकाला किरकोळ कारणावरून एका टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे एक वृद्ध भाविक गंभीर जखमी झाला आहे. तसे पाहता मंदिरासाठी पोलिसांची खास सुरक्षा व्यवस्था नेमलेली आहे. याशिवाय ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या चौफाळा ते पश्चिम द्वार या मार्गावर देखील पोलीस असतात. असे असताना देखील मंदिर परिसरात दर्शनाला आलेल्या पुणे येथील या वृद्ध भाविकांना ज्या पद्धतीने मारहाण झाली. त्यामुळं आता विठ्ठलाचे भक्त तरी सुरक्षित आहेत का? असा प्रश्न विचारायची वेळ आलेली आहे. या प्रकरणाचा सीसीटीव्ही बाहेर आल्यावर पोलीस जागे झाले आणि त्यांनी या आरोपींचा शोध सुरू केला आहे. आज दुपारी या ठिकाणी फॉरेनसिक् ची टीम सुद्धा तपासणीसाठी घटनास्थळावर दाखल झाली आहे. मात्र विठ्ठल मंदिरात दर्शनाला आलेल्या भाविकांच्या सुरक्षेचे काय? असा संतप्त प्रश्न भाविक करु लागलेत.
महत्वाच्या बातम्या:
























