माढ्यात धक्कादायक घटना! 14 वर्षाच्या मुलानं केली आत्महत्या, वडीलांच्या बंदुकीनं डोक्यात झाडली गोळी
माढा तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढ्यातील आढेगावमध्ये 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
सोलापूर : माढा (Madha) तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. माढ्यातील आढेगावमध्ये 8 वी मध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलाने आपल्या वडिलांच्या बंदुकीने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असं आत्महत्या केलेल्या 14 वर्षीय मुलाचे नाव आहे. आज दुपारी साडेबाराच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे.
खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय
मुलाचे वडील गणेश नष्टे हे सिमा सुरक्षा दलात कार्यरत आहेत. बंदुकीचे लायसन जम्मू काश्मीरची असून वडिलांची घरातील बंदुक घेऊन घरातील खुर्चीवर बसून डोक्यात गोळी झाडून श्रीधरने आत्महत्या केली आहे. टेभुर्णी पोलिस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, खेळता खेळता ही दुर्घटना घडली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
आत्महत्येचे कारण समजू शकले नाही
याबाबत अधिक माहिती अशी की श्रीधर हा सराटी (ता. इंदापूर) येथील जिजामाता प्रशालेमध्ये आठवीत शिक्षण घेत होता. घटनेदिवशी तो आजारी असल्याने घरीच होता. त्यास दवाखान्यात तपासणी करून आणले होते. डॉक्टरने त्यास विश्रांतीचा सल्ला दिला होता. त्याने अज्ञात कारणाने सोमवारी दुपारी घरात वरच्या मजल्यावर जाऊन रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून घेत आत्महत्या केली. गोळीबाराचा आवाज एकून घरातील आई, आजोबा व इतर धावत आले असता तो रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. श्रीधर याचे वडील राजस्थानमध्ये सीमा सशस्त्र दलात पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असल्याचे समजते. तो आई, लहान भाऊ, आजी, आजोबा यांच्यासमवेत राहत होता. टेंभुर्णी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे या करीत आहेत.
14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ
दरम्यान, या 14 वर्षाच्या मुलानं आत्महत्या केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. नेमकी ही घटना घडली कशी? या मुलाने का आत्महत्या केली याबाबतची अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, या घटनेची टेंभुर्णी पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहे. मात्र, या घटनेमुळं परिसरात हळहळ देखील व्यक्त केली जात आहे.
महत्वाच्या बातम्या: