एक्स्प्लोर
सोलापुरात ओढ्यात जीप वाहून गेली, बापलेक बचावले
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ओढे-नाले भरुन वाहत आहेत. याच वेगाने वाहणाऱ्या ओढ्याच्या पाण्यात दोन प्रवाशांसह जाणारी सुमो वाहून जात होती, मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली.
बार्शी-भूम मार्गावर ओढ्यात एक सुमो वाहून जात होती. MH25 R 7141 या क्रमांकाची सुमो उस्मानाबादहून पुण्याला चालली होती. शुक्ला शोरुम जवळ असताना ओढ्याच्या पाण्याचा अंदाज चालकाला आला नाही, त्यामुळे त्याने गाडी ओढ्यातून नेली.
पाण्याचा वेग इतका जास्त होता, की गाडी ओढ्यात वाहून गेली. त्यावेळी गाडीत 35 वर्षीय मारुती विष्णु बोरकर आणि 12 वर्षांची गौरी मारुती बोरकर हे बापलेक होते.
पाण्याच्या प्रवाहात वाहू लागल्याचं लक्षात येताच दोघांनी आरडाओरडा केला. मागून येणाऱ्या दुधाच्या गाडीतील प्रवाशांनी दोघांना पाण्यातून सुखरुप बाहेर काढलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement