एक्स्प्लोर
सोलापुरात गोंधळी भाजप उमेदवाराला पोलिसांची मारहाण

सोलापूर : सोलापुरात भाजप उमेदवाराला पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. विजापूर नाका पोलिसांनी सुभाष शेजवळ यांना मारहाण केल्याचा दावा केला जात आहे. सोलापुरातील प्रभाग क्रमांक 25 मधील मतदान केंद्रावर मारहाण झाल्याचा आरोप होत आहे. मतदान केंद्राजवळ जमाव गोळा करुन गोंधळ घालत असल्याने पोलिसांनी कारवाई केल्याचं सांगितलं जात आहे. शूटींग घेणाऱ्या वृत्तवाहिनीचा कॅमेराही काढून घेतल्याचं वृत्त आहे. उल्हासनगरात पोलिसांची वृद्धाला मारहाण उल्हासनगर येथील पॅनल 17 मध्ये मतदान करुन घरी जात असलेल्या जेष्ठ नागरिकाला पोलिसाने मारहाण केल्याचा आरोप होत आहे. पोलिस आणि नागरिकामध्ये मतदान केंद्रापासून 100 मीटरमध्ये प्रवेश करण्यावरुन वाद झाला. त्यानंतर ही मारहाण झाल्याचं म्हटलं जात आहे. मतदान केंद्राजवळ माझं घर आहे, मला जाऊ दया असं वृद्धाने सांगितलं. मात्र पोलिसाने आडमुठी भूमिका घेत जेष्ठ नागरिकाला मारहाण करत 100 मीटरच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, असा आरोप होत आहे.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र





















