गोरेगावातील जनतेसाठी नवी आशा, समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला
समाजसेवक संदीप जाधव यांच्यामुळे गोरेगावातील पाणीटंचाई आणि अंधाराचा प्रश्न सुटला आहे.

गोरेगाव पूर्व येथील राजीव गांधी नगर, साई नगर, वीट भट्टी, कोयना वसाहत या परिसरात अनेक वर्षांपासून असलेली पाणीटंचाई आणि प्रकाशव्यवस्थेची समस्या अखेर मिटली. नागरिकांच्या या दैनंदिन संघर्षाची दखल घेत समाजसेवक संदीप जाधव यांच्या पुढाकाराने या भागांमध्ये नवीन पाणी पाइपलाईन जोडण्यात आल्या असून नागरिकांना स्वच्छ आणि नियमित पाण्याचा पुरवठा मिळू लागला आहे. आज या भागांमध्ये घराघरांत पाणी पोहोचू लागल्याने रहिवाशांनी दिलासा व्यक्त करत जाधव यांचे विशेष आभार मानले आहेत.
यासोबतच, गल्ली मधील प्रकाशव्यवस्थेचा अभाव हा देखील नागरिकांसाठी मोठा प्रश्न होता. अंधारामुळे अपघात, चोरी, महिलांची सुरक्षितता आणि लहान मुला-मुलींच्या खेळण्यावर सुद्धा मर्यादा निर्माण होत होत्या. हा प्रश्न संदीप जाधव यांच्या जनता दरबारात नागरिकांनी मांडल्यानंतर ज्या परिसरांमध्ये दिवे नव्हते, तेथे संदीप जाधव यांनी नवे LED स्ट्रीटलाईट्स बसवून घेतले. आज या गल्ली मधील उजेडामुळे नागरिकांना अखेर सुरक्षित वाटू लागले आहे.
स्थानिक नागरिकांनी संदीप जाधव यांच्या कामाचे मनापासून कौतुक केले असून, “आमचे प्रश्न प्रत्यक्षात ऐकून त्यावर काम करणारा नेता मिळणे हे आमच्यासाठी मोठे भाग्य आहे,” असे मत व्यक्त केले आहे.
जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे संदीप जाधव गोरेगाव परिसरात विकासाची नवी दिशा देत आहेत. त्यांच्या या उपक्रमांमुळे नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून आगामी काळात अशाच विकासकामांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
संदीप जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून आजपर्यंत ५८०० हुन अधिक नागरिकांना इ-श्रम कार्डचे वितरण करण्यात आले आहेत. प्रचंड मोठ्या संख्येने मुंबई शहरामध्ये इ-श्रम कार्डचे वितरण करणारे एकमेव समाजसेवक म्हणून आता संदीप जाधव यांची सवर्त्र चर्चा होत आहे.
जनता दरबार नागरिकांच्या समस्या तत्काळ सोडवण्याचा उपक्रम
जनतेचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी मुंबई मध्ये जनता दरबार आयोजित करणारे एकमेव समाजसेवक म्हणून संदीप जाधव यांची ओळख निर्माण झाली आहे. संदीप जाधव हे जनतेसाठी सदैव उपलब्ध राहावेत या उद्देशाने जनता दरबार आयोजित करतात. या जनता दरबारात शिधापत्रिकांचे व शिधावाटपाचे प्रश्न, पाणी, ड्रेनेज, आरोग्य, रस्ते, वीज, कागदपत्रे, सामाजिक योजना अशा अनेक विषयांवरील तक्रारी ऐकून तत्काळ कारवाई केली जाते. त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना समाजसेवक संदीप जाधव यांच्या पर्यंत थेट पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
कोविड काळातील मदत गरीबांसाठी मोठा आधार
कोविड संकटाच्या काळात शहर ठप्प झाले असताना गरीब कुटुंबांसमोर उपासमारीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या कठीण काळात संदीप जाधव यांनी मोफत राशन किट्स, पाणी, मास्क, सॅनिटायझर्स, औषधांची उपलब्धता आणि गरजूंसाठी भोजनसेवा सुरू ठेवली. हॉस्पिटल्सशी समन्वय साधून बेड उपलब्ध करून देणे, ऑक्सिजन सिलिंडरांची मदत, तसेच कोविड योद्ध्यांना आवश्यक साहित्य पुरवणे अशा विविध माध्यमातून त्यांनी हजारो लोकांना दिलासा दिला.
दिवाळीत गरजूंना राशन आणि मदत साहित्य
दरवर्षी दिवाळीच्या काळात जाधव अन्नधान्य किट्स, डाळ-तांदूळ, तेल, गोडधोड साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंचे वितरण करुन गरीब कुटुंबांची सणासुदीची चिंता कमी करतात. अनेक वृद्ध, विधवा आणि आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांना या उपक्रमाचा मोठा आधार मिळत आहे.
गोरेगावातील पाणी, रस्ते, प्रकाशयोजना, कोविड मदत, जनता दरबार आणि सणासुदीतील सहाय्य या सर्व उपक्रमांमुळे संदीप जाधव यांनी विकास आणि सेवा यांचा आदर्श ठेवणारा समाजसेवक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांना प्राधान्य देत काम करणाऱ्या या समाजसेवकांमुळे गोरेगावातील परिसर अधिक सुरक्षित, सुसज्ज आणि सुजाण बनत आहे.
Disclaimer: This is a sponsored article. ABP Network Pvt. Ltd. and/or ABP Live does not in any manner whatsoever endorse/subscribe to the contents of this article and/or views expressed herein. Reader discretion is advised.























