(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 21 नोव्हेंबर 2021 : रविवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. एसटी कर्मचारी आणि परिवहनमंत्र्यांमधील बैठक निष्फळ, समितीच्या अहवालानंतर कोर्टाचा निर्णय मान्य, सरकारची भूमिका
2. सिंघु बॉर्डरवर आज शेतकऱ्यांची पुन्हा बैठक, एमसपीसह ५ मुद्द्यांवर सरकारशी चर्चेची तयारी
3. स्वच्छ सर्वेक्षणातील सर्वाधिक पुरस्कार महाराष्ट्राला, विट्यासह सासवड, लोणावळा नगरपालिकांचा सन्मान
4. राजस्थानमध्ये जुनं राज्य, नवे मंत्री; सचिन पायलट गटातील 5 जणांना मंत्रिमंडळात संधी, आज नव्या मंत्र्यांचा शपथविधी
5. स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विशाखापट्टणम आज नौदलात दाखल होणार, जहाजावरुन ब्रह्मोस आणि बराक सारखी मिसाईल सोडणं शक्य
INS Visakhapatnam : स्वदेशी बनावटीची युद्धनौका INS विशाखापट्टणम आज नौदलात दाखल होणार आहे. जहाजावरुन ब्रह्मोस आणि बराक यासारखी मिसाईल सोडणं शक्य आहे. यामुळे भारताची ताकद आणखी वाढणार आहे. स्वदेशी स्टेल्थ मिसाईल डेस्ट्रोयर जहाज आयएनएस विशाखापट्टनम संरक्षण मंत्री राजनाथ सिंगाच्या उपस्थित नौदलात दाखल होणार आहे. राजनाथ सिंग यांनी याबाबत ट्वीट केलं आहे. मुंबई डॉकयार्ड मध्ये राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत INS विशाखापट्टणम नौदलात दाखल होणार आहे.
6.आर्यन खानवरील आरोपात तथ्य दिसत नाही, जामीनावेळेची हायकोर्टाच्या आदेशाची प्रत समोर
7. प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांच्या हस्ते 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार
8. 'दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत' मध्य प्रदेशच्या अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल
MP Viral Video: खांडवा जिल्हा प्रशासनानं गुरुवारी (18 नोव्हेंबर 2021) कोरोनाबाबत आढावा बैठक बोलावली होती. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी खंडवा जिल्ह्यात मेगा लसीकरण मोहिम राबवली जातं आहे. या मोहिमेतंर्गत प्रत्येक नागरिकाला लसीकरण करणे बंधनकारक आहे, अशी या बैठकीत चर्चा झाली. याचदरम्यान, जिल्हा प्रशासनानं दारू खरेदी करणाऱ्यांबाबत मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानुसार, लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच दारू विकली जाईल, असं सांगण्यात आलं. मात्र, दारू खरेदी करण्यासाठी लसीकरण प्रमाणपत्र आवश्यक नसल्याचं खंडवा जिल्ह्याच्या उत्पादन शुल्क अधिकाऱ्यानं म्हटलंय. दारू खरेदी करणाऱ्यांनी तोंडी दिलेली माहिती पुरेशी असेल. तसेच दारू पिणारे कधीच खोटं बोलत नाहीत, असंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. या अधिकाऱ्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलीय.
9. शॉर्टस् घातल्याने SBI बँकेत प्रवेश नाकारला, सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
मुंबई : 'ग्राहक देवो भवः' ही आपल्या देशाची संस्कृती आहे. परदेशात भारतीयांना त्यांच्या पेहरावरून प्रवेश नाकारल्याचे आपण ऐकले आहे. मात्र आता भारतामध्ये देखील अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशीच एक घटना कोलकाता येथील बँकेत घडली आहे. थ्री फोर्थ घालून हॉटेलमध्ये आलेल्या व्यक्तीला बँकेत प्रवेश नाकारण्यात आला. कोलकाता येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) शाखेत हा प्रकार घडला आहे. बँकेत थ्री फोर्थ घालून आला म्हणून एसबीआय शाखेत प्रवेश नाकारल्याची ग्राहकाने तक्रार केली आहे. तसेच फुलपॅन्ट घालून येण्याचा सल्ला दिल्याचं ट्विट करुन सांगितलं आहे.
10. न्यूझीलंडविरोधात आज अखेरचा टी-20 सामना, मालिका जिकल्यानं भारताला प्रयोगाची संधी!