एक्स्प्लोर
स्मार्ट बुलेटिन | 28 मे 2019 | मंगळवार | एबीपी माझा
#Maharashtra #ABP Majha Whatsapp Bulletin : राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. महाराष्ट्र बोर्डाच्या बारावी परीक्षेचा आज निकाल, दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन निकाल पाहण्याची सोय, विद्यार्थ्यांची धाकधूक वाढली 2. आदित्य ठाकरे विधानसभा लढवणार का? युवासेना सरचिटणीसांच्या पोस्टनंतर चर्चांना उधाण, तर केंद्र आणि राज्यातल्या मंत्रिपदासाठी मातोश्रीवर बैठक 3. काही अटींवर राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार, सूत्रांची माहिती, प्रियांका गांधी आणि अहमद पटेल यांच्या भेटीनंतर निर्णय 4. लोकसभा निवडणूक निकालानंतर इंधनाचे दर नियंत्रणात ठेवण्याचं मोदी सरकारसमोर आव्हान, पेट्रोलचे दर 3 रुपयांनी वाढणार, तज्ज्ञांचं भाकित 5. लोकसभा निवडणूक निकालानंतर खचलेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का, राधाकृष्ण विखे-पाटील चार आमदारांसह जूनच्या पहिल्या आठवड्यात भाजपमध्ये जाणार, सूत्रांची माहिती 6. लोकसभा निवडणुकीच्या आढाव्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची आज मुंबईत बैठक, मंथनासोबत येत्या विधानसभेची रणनीतीही ठरवण्याची शक्यता 7. शिवसेनेचे सर्व खासदार मराठीतच शपथ घेणार, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंची माहिती, #मराठीतशपथ मोहिमेला अनेकांचा पाठिंबा, इतर पक्षाच्या खासदारांची मराठीत शपथ घेण्याची तयारी 8. उर्मिला मातोंडकरबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा पुणे पोलिसांच्या ताब्यात, काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आक्रमक झाल्यानंतर गुन्हा दाखल 9. मुंबई म्हाडाच्या 217 घरांसाठी 2 जून रोजी सोडत, तर मुंबई कोकणातील 910 गाळ्यांचाही लिलाव, म्हाडाचे अध्यक्ष मधू चव्हाण यांची माहिती 10. मराठमोळ्या राही सरनोबतची विश्वचषक नेमबाजीत सोनेरी कामगिरी, राहीला 25 मीटर्स पिस्टल प्रकारात सुवर्ण, टोकिओ ऑलिम्पिकचं तिकीटंही कन्फर्म
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत























