Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 एप्रिल 2021 | गुरुवार | ABP Majha
1. महाराष्ट्रात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं शासकीय रुग्णालयात मोफत लसीकरण, पुरेशा साठ्याअभावी राज्यात 1 मे पासून लसीकरण सुरु होणार नाही, आरोग्यमंत्र्यांची माहिती
2. पहिल्याच दिवशी Cowin App वर लसीकरणासाठी एक कोटींहून अधिक नागरिकांची नोंदणी, 1 मे पासून 18 वर्षांवरील सर्वांचं लसीकरण
3. राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवला, रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्यव्यवस्था वाढवण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यावर मंत्र्यांचं एकमत
4. मुंबईत कोविशील्डचा साठा उपलब्ध, कोवॅक्सिनचा मात्र तुटवडा, आज दुपारी 12 वाजल्यानंतर शासकीय आणि महापालिकेची लसीकरण केंद्र सुरु राहणार
5. सीरम इन्स्टिट्यूटकडून कोरोना लसीची किंमत कमी, महाराष्ट्राला 400 ऐवजी 300 रुपयात एक डोस मिळणार, अदर पुनावाला यांची माहिती
6. मुख्यमंत्री काम करतात दिखावा करत नाही, आदित्य ठाकरे यांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर, सतत टीव्हीवर येण्याची गरज नसल्याचा विरोधकांना टोला
7. कोरोनाबाधित असलेल्या काँग्रेस खासदार राजीव सातव यांची तब्येत खालावली, उपचार करण्यासाठी लीलावती रुग्णालयामधील डॉक्टरांची टीम पुण्याला जाणार
8. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ, सिंह यांच्यासह एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात अकोल्यात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
9. वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक, अमरावती पोलिसांची कारवाई
10. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी आज अखेरच्या टप्प्यासाठी मतदान, 2 मे रोजी ठरणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री