Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 15 डिसेंबर 2021 : बुधवार : ABP Majha
देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एबीपी माझाच्या स्मार्ट बुलेटीनमध्ये...
1. बैलगाडा शर्यतीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी, बंदी उठणार की नाही याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
2. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात आज महत्त्वाचा निकाल अपेक्षित, राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांचं भवितव्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार
3. राज ठाकरेंच्या पुणे दौऱ्यापूर्वीच मनसेला धक्का; रुपाली पाटील यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र', राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता
4. मुंबईत आजपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरु, मुंबई महापालिकेचे मुख्याध्यापकांना निर्देश, पुण्यात उद्यापासून वर्ग भरणार
5. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू वोट बॅंक विकसित केली, वाजपेयी-मोदींकडून कळस'; भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे अजब वक्तव्य
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या निवडणूक तिकिटांबाबत बोलताना चंद्रकांत पाटील यांनी चर्चेचा रोख हिंदू व्होटबँकेपर्यंत नेला. 'छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू व्होट बँक विकसित केली, वाजपेयी-मोदींनी त्यावर कळस चढवला' असल्याचे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी म्हटले की, चंद्रकांत पाटील यांनी असे वक्तव्य करून तारे तोडले आहेत. शिवरायांचा अवमान करणारी ही भाजपाची छिंदम प्रवृत्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेचे राज्य उभारले. चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य बालिश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली.
6. मंत्रालयात विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांना 200 रुपयांचा दंड, पोलिसांची कारवाई
7. कोरोनाच्या इतर व्हेरियंटपेक्षा ओमायक्रॉन हा सर्वाधिक वेगाने फैलावणारा व्हेरियंट, WHO ने दिला इशारा
8. कुख्यात गुंड सुरेश पुजारीला भारतात आणण्यात पोलिसांना यश, मुंबई ठाण्यासह अनेक शहरात गंभीर गुन्ह्यांची नोंद
9. मैत्रिणीला गिफ्ट देण्यासाठी डॉक्टर बनला चोर, पुण्यातील सराफाच्या दुकानांवर हात साफ करणारी दुकली गजाआड
10. आंतरराष्ट्रीय फॅशन इंडस्ट्रीत कोल्हापूरचा झेंडा, कोल्हापूरच्या लीना नायर यांची प्रसिद्ध फ्रेंच ब्रँड शनेलच्या सीईओपदी नियुक्ती