एक्स्प्लोर

शरद पवार म्हणतात, मी पावसात भिजून भाषण केलं अन्...

पवार प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे बारामतीत पाहायला मिळाले आहे. एका कार्यक्रमात सहभागी एका बालगायिकेने शरद पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली.

बारामती : माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार किती हजरजबाबी आहे याचे किस्से आपण कायमच ऐकत आलो आहोत. पवार प्रत्येक वयातील प्रत्येकासोबत किती सहजतेने संवाद साधतात हे बारामतीत पाहायला मिळाले आहे. बारामतीच्या गदिमा सभागृहात शारदोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी एका बालगायिकेने शरद पवार यांना काही प्रश्न विचारण्याची परवानगी मागितली. गायिका असलेल्या या छोट्याशा चिमुरडीला पवारांनी होकार दिला. आता ही चिमुरडी पवारांना काय प्रश्न विचारणार व त्यावर पवार काय उत्तर देणार याकडे सर्व उपस्थितांचे लक्ष होते. तिने पहिला प्रश्न केला,  मला कविता करता येतात पण तुम्ही इतकी छान भाषणं कशी काय देता हो? पवार हसत हसत म्हणाले, मी भाषण देऊ शकतो पण कविता काही करु शकत नाही, इथं तुझी आणि माझी परिस्थिती सारखीच आहे, या उत्तरावर उपस्थितांमध्ये जोरदार हशा पिकला. चिमुरडीने दुसरा प्रश्न केला. मी जेव्हा पावसात भिजायला जाते, तेव्हा माझे आजोबा मला खूप रागावतात पण तुम्ही इतक्या जोरदार पावसात कसं काय भाषण दिलं. पवार हसून तिला म्हणतात...तुझे आजोबा तुला रागावत असले तरी मी पावसात भिजून भाषण केल्याने माझ्या मतदारांनी मला जास्त मते दिली. या उत्तरावर जोरदार टाळ्या मिळाल्या. शरद पवारांची साताऱ्यातील सभा पायाला होणाऱ्या असह्य वेदना आणि अशा अवस्थेत 79 वर्षांच्या शरद पवारांनी 18 ऑक्टोबरला साताऱ्यात भरपावसात सभा घेतली होती. ही सभा साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीसाठी टर्निंग पॉईंट ठरली. भर पावसात भाषण करणाऱ्या शरद पवारांची दृश्ये प्रेरणादायी ठरली. व्हॉट्सअप, ट्विटर आणि फेसबुकवर केवळ पवारांच्या भर पावसातील भाषणाची चर्चा होती. या सभेत राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपवासी झालेल्या उदयनराजेंवर त्यांनी निशाणा साधला होती. लोकसभेत उदयनराजेंना उमेदवारी देऊन चूक केली, अशी कबुली शरद पवारांनी दिली होती. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत उदयनराजेंना मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांनी 87,717 मतांनी उदयनराजेंचा पराभव केला.

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray and Raj Thackeray: मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा, नरेंद्र मोदींपासून सरन्यायाधीशांपर्यंत...; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, पुढचा सगळा प्लॅन सांगितला!
मुंबईत 26 जुलैला ठाकरे बंधूंचा मोर्चा, नरेंद्र मोदींपासून सरन्यायाधीशांपर्यंत...; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, पुढचा सगळा प्लॅन सांगितला!
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Maharashtra Live News Updates: जंतर मंतरवर काही काळ गदारोळ, पुन्हा तणावपूर्ण शांतता
Cab Ride New Rule: विमानतळ, रेल्वे स्टेशनसह रुग्णालयसाठीची राईड रद्द केल्यास टॅक्सी कंपनींना मोजावा लागेल पाचपट दंड; थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा होईल रक्कम, नवा नियम काय?
विमानतळ, रेल्वे स्टेशनसह रुग्णालयसाठीची राईड रद्द केल्यास टॅक्सी कंपनींना मोजावा लागेल पाचपट दंड; थेट प्रवाशाच्या ॲप वॉलेटमध्ये जमा होईल रक्कम, नवा नियम काय?
Jalgaon Crime News: कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ
कामावर जाण्यासाठी घरातून निघाला अन् काही वेळातच हायवेलगत मृतावस्थेत सापडला; जळगावात 28 वर्षीय तरुणाच्या मृत्यूने खळबळ

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Tukaram Munde FDA Action On BMC Canteen Mumbai: मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनवर धाड टाकत थेट सील करुन टाकले; तुकाराम मुंढेंच्या FDA ची कारवाई
Sonam Wangchuk Health Update: उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
उपोषणावरती सोनम वांगचुक अद्यापही ठाम; डॉक्टरांनी सांगितली तब्येतीची अपडेट, म्हणाले 'दुष्परिणाम त्यांच्या ऑर्गन्सवर होऊ शकतो, सरकारने...'
Sameer Choughule Angry On Student Protest: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम समीर चौघुलेंची विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर खरमरीत पोस्ट, नको-नको ते बरळणाऱ्यांनाही खडसावलं, म्हणाले...
Nashik Rain: नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
नाशिकमध्ये जोर'धार', दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी; गंगापूर धरणातून विसर्ग वाढवला, त्र्यंबकेश्वरला पत्रे उडून तीन भाविक जखमी
Embed widget