सिंधुदुर्ग : जिल्ह्यात शिवसेना तालुक्या-तालुक्यात मेळावे घेत आहे. जिल्ह्यातील पहिला तालुका मेळावा कुडाळमध्ये नुकताच पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेचे सचिव आणि खासदार विनायक राऊत, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना नारायण राणेंवर विनायक राऊतांनी जोरदार टीका केली. यावेळी नारायण राणेंच गद्दार असून त्यांच्यात हिम्मत असेल तर राणेंनी वैभव नाईक यांच्या समोर विधानसभा निवडणुकीत उभं राहून दाखवावं डिपॉझिट जप्त केले नाही तर नाव सांगणार नाही असं खासदार विनायक राऊत म्हणाले.
खासदार विनायक राऊत म्हणाले की, "विकासकामांत शिवसेना कुठेही कमी नाही आणि शिवसेना पक्ष प्रवेश घेत तेव्हा आखोदेखा प्रवेश असतो. कुठेतरी आपल्याच माणसाला आणायचं आणि त्याला दुसरं नाव देऊन प्रवेश करून घ्यायचा जे नाटक किंवा की नौटंकी जी भाजप मध्ये चालते. नारायण राणे पुरस्कृत भाजपमध्ये ही नौटंकी चालते. खरा भाजपा बिचारा बाजूलाच गेला. कुठे भेटत पण नाही आता शोधावं लागत खरे भाजावाले कुठे आहेत का? कालच्या आलेल्यानी नौटंकी करणाऱ्यानी भाजप पूर्णपणे गिळंकृत केला आहे."
आता उद्यापासून काही जणांच्या पोटात पोटशूळ उठणार, टूर टूर चालू करणार. आणि एक तर आहे त्याला दिवसही नाही, रात्रही नाही. मनात आलं की विनायक राऊताना शिव्या घालायच्या, उदय सामंताना शिव्या घालायच्या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शिव्या घालायच्या, वैभव नाईकांना शिव्या घालायच्या असा टोला माजी खासदार निलेश राणे यांना शिवसेनेचे सचिन विनायक राऊत यांनी लागवला. काही जणांचा जन्म हा दगड फोडण्यासाठीच असतो. त्यांच्यातल ते मोठं कारट असा उल्लेख विनायक राऊत यांनी केला आहे. ज्या मुख्यमंत्र्यांच्या पोटी तुम्ही जन्म घेतलात, निदान त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची तरी शान राखा. रात्रीचे ढोसता ते ढोसता आता दिवसाचे पण. संत तुकोबा महाराजांनी म्हटलच आहे निंदकाच घर असावे शेजारी. आम्ही त्याच्या पुढे जाऊन सांगतो शिव्या घालणाऱ्याच घर शेजारीच असू देत. त्याच काय भलं व्हायचं ते होऊ देत. भलं होणार नाही, भलं होणार तर शिवसेनेचेचं होणार असंही ते म्हणाले.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून किती टूर टूर किती टाव टाव करायची. ज्या उद्धव ठाकरेंनी संपूर्ण देशात दाखवून दिलेलं आहे, की पंतप्रधान तुमचे असतील. गृहमंत्री तुमचे असतील. पण बेताल वक्तव्य तुमचे मंत्री करत असतील तर त्याला तुरुंगात घालू शकतो हे मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं. नारायण राणे ही वाणी भगवंताने दिलेली आहे. ती चांगल्यासाठी असते. त्याचा चांगल्यासाठी उपयोग करा. ठीक आहे तुम्हाला अभंग म्हणता येत नाहीत, पण निदान चांगलं तर बोला. दिल्लीकराना खुश करण्यासाठी नारायण राणे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका करतात. त्या नारायण राणेंना आम्ही दाखवून दिलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोनदा पोराला आपटलं, एकदा तुला आपटलं. हिम्मत असेल तर नारायण राणेंनी वैभव नाईकांसमोर विधानसभेला उभ राहून दाखवावं असं खुलं आवाहन शिवसेनेचे खासदार आणि सचिव विनायक राऊत यांनी केलं आहे. हिंमत असेल तर नारायण राणे विधानसभेला उभे राहावं, त्याच डिपॉझिट जप्त केल्याशिवाय गप्प राहणार नाही, नाहीतर नाव सांगणार नाही असे विनायक राऊत यावेळी बोलले.
लाचारी करणारे शिवसेनेला बेईमान म्हणतात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना गद्दार म्हणतात. बाळासाहेबाच्या आशीर्वादाने नारायण राणे मुख्यमंत्री झाले. बाळासाहेबानी शेंदूर फासला आणि महाराष्ट्राने देव समजून त्यांना नमस्कार केला. झालं काही दिवसांनी बाळासाहेबांना शिव्या, काँगेस मध्ये गेले त्यांना सोनिया गांधीनी मुख्यमंत्री केलं नाही म्हणून त्यांना शिव्या घातल्या. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी, अमित शहाना, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्वांना शिव्या दिल्या. स्वताच्या पक्षाला सुध्दा नारायण राणेंनी शिव्या दिल्या. म्हणून तो पक्षही बरखास्त केला अशी टीका विनायक राऊतांनी नारायण राणेंवर केली.
एका व्यक्तीने जन्माला घातलेल्या आपल्या पक्षाला एक वर्षाच्या आत कोणी विसर्जन केलेलं आहे का? असा सवाल करत विनायक राऊत म्हणाले की, "राणेंनी स्वत:च्या पक्षाचं एका वर्षात विसर्जन केले आणि भाजप मध्ये गेले. भाजपला पण हे कोणीतरी हवं होतं. म्हणून त्यांनी पुढे केलं बाहूलं. भाजपने सुध्दा लक्षात ठेवावे, सिंधुदुर्ग जिल्हा आणि महाराष्ट्र शिवरायाचा महाराष्ट्र आहे. तिथे ह्या महाराष्ट्रात नारायण राणेंसारख्या गद्दाराची कधीही डाळ शिजणार नाही, आज नाही भविष्यात कधीही शिवसेनेच्या अंगावर आले तर हा मर्द शिवसैनिक त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. असं ह्या महाराष्ट्राचं रक्त आहे."
विनायक राऊत पुढे म्हणाले की, "चिपी विमानतळाचं केव्हढं मोठ व्यासपीठ, केवळ जिल्हा नव्हे, राज्य नव्हे संपूर्ण देश सिंधुदुर्ग विमानतळाचा उदघाटन सोहळा पाहत होता. त्या भाजपच्या लोकांनी सुध्दा डोक्यावर हात मारले. कुठली पणवती आपल्या बाजूला येऊन बसली आणि त्यांनी औदसे सारख भाषण केले. मग काय उद्धव ठाकरे सोडतील का त्यांना. त्या व्यासपीठावरून सांगितले या विमानतळाला विनायक राऊत विरोध करत होते. मात्र आमचा विरोध विमानतळाला नव्हता. तर त्या विमानतळाच्या नावावर 15 रुपये एकर जमीन खरेदी करणाऱ्या नारायण राणेंना विरोध होता. 15 रुपये एकर घेण्यासाठी नारायण राणेंच्या अंगात देवचात आले. विमानतळाच्या नावाखाली तहसीलदाराना बोलवून 934 एकरवर पेन्सीलने नकाशा बनवला. ही जमीन राणेंनी बायकोच्या नावावर नीलम होटेलच्या नावावर आणि राजन तेलीच्या नावावर घेतली. राणे विमानतळाच्या नावाखाली बायकोच्या नावावर परुळे, चिपी या गावाच्या आजूबाजूची जमीन जाणार म्हणून आम्ही विरोध केला."
विनायक राऊत पुढे म्हणाले की, "सी वर्ड साठी नारायण राणे या पट्ट्याने 1400 एकरवर पेन्सील फिरवली म्हणून राहिलो विरोधात. एकीकडे भाजप हिंदुत्ववादी असल्याचं म्हणतात आणि दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सी वर्ड च्या नावाखाली जमिनी घेऊन मंदिर उध्दव करायची, लोकांची घर शेती उध्वस्त करायची आणि 1400 एकर जमीन गिळंकृत करायची याला आमचा विरोध आहे. आम्हाला 300 ते 400 एकरमध्ये करण्याची तयारी आहे. मात्र सरकारने आता रद्द केल्यामुळे राणे थंयथंयाट तर करणारच. तोंडातला घास काढून घेतला. त्यामुळे आता बोलायला मोकळे झाले शिवसेनेने काय केलं."
महत्वाच्या बातम्या :