NIA Raid : दहशतवादी हल्ल्याच्या कटाचं बुलढाणा कनेक्शन, एकाच वेळी NIA चे बुलढाणा आणि गुजरातमधील गोध्रात छापे
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुलढाणा आणि गुजरातमधील गोध्रा इथे छापे मारल्याची माहिती मिळत आहे. एकाच वेळी हे छापे मारले आहेत.
NIA Raid : हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुलढाणा आणि गुजरातमधील गोध्रा इथे छापे मारल्याची माहिती मिळत आहे. रात्री उशिरा हे छापे टाकण्यात आले आहेत. जानेवारी 2020 मध्ये आंध्र प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात हे छापे मारले असल्याचं NIA (National Investigation Agency) ने म्हटलं आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, पाकिस्तानी हेरांचा या कृत्यात सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे. गुजरातमधील गोध्रा आणि बुलढाणा येथे एकाच वेळी छापे मारण्यात आले असून यात काही संशयास्पद सिम कार्ड, संशयास्पद कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य देखील जप्त केले असून, पुढील कारवाई होत आहे. 2020 मध्ये आंध्र प्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्या संदर्भात हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे.